मुंबई

कल्याण अवतीभवती

CD

फेरीवाला प्रश्नावरून आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या
कल्याण (वार्ताहर) : डोंबिवली स्थानक परिसर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवालामुक्त करावा, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने डोंबिवलीत महापालिका प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाचे शिष्टमंडळ बुधवारी महापालिका आयुक्तांकडे पोहोचले. स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे लेखी आश्वासन द्या, असा आग्रह धरला. चर्चेदरम्यान आयुक्त अभिनव गोयल यांचा संयम ढळल्याचा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केला. या कारणावरून शिष्टमंडळाने चर्चा सोडून आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पुन्हा आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा केली. लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्याचे उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाने सांगितले. ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डोंबिवली स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी ११ जून रोजी स्थानक परिसरात बेमुदत उपाेषण सुरू केले होते. तीन दिवस हे उपोषण सुरू होते. त्यांना त्या वेळी आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. यामुळे अखेरीस शहरप्रमुख सावंत यांनी पुन्हा २१ जुलैला स्थानक परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले. स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याच्या मागणीवर आग्रही असलेले ठाकरे गटाचे शहरप्रमुख सावंत, सचिन बासरे, महिला पदाधिकारी, वैशाली दरेकर, आरती मोकल, मृणाल यज्ञेश्वर, अरविंद बिरमोळे, किशोर मानकामे, अक्षरा पटेल, राहुल चौधरी, धनंजय चाळके, शंकर राऊळ यांनी बुधवारी आयुक्तांची भेट घेतली.
........................
सीएसआर कक्षाद्वारे सामाजिक उपक्रमांना चालना
कल्याण (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी खासगी औद्योगिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादीमार्फत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत अनेक सुविधा महापालिकेमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. या सीएसआरअंतर्गत निधी प्राप्त होऊन अथवा प्रत्यक्ष तज्ज्ञ व्यक्तींच्या सहकार्याच्या माध्यमातून महापालिकेला अनेक सामाजिक उपक्रम राबविणे, कामे करणे सहज सुलभ होऊ शकते. कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत खासगी क्षेत्रातील संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आदींसमवेत चर्चा घडवून योग्य नियोजनाद्वारे दीर्घकाळ टिकणाऱ्या सुविधा, महापालिका प्रशासनावर कोणताही आर्थिक भार न येता निर्माण केल्या जाऊ शकतात. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सीएसआर कक्षाची स्थापना केली असून, महापालिकेचे लेखा व मुख्य वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, शहर अभियंता अनिता परदेशी, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे, विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपायुक्त प्रसाद बोरकर, कांचन गायकवाड, संजय जाधव हे या सीएसआर कक्षाचे सदस्य असून, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत हे या सीएसआर कक्षाचे सदस्य सचिव राहतील.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

National Health Emergency Plea: दिल्लीसह देशभरात प्रदूषणाचा कहर; 'आरोग्य आणीबाणी'चे आदेश द्या! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मनोरंजन विश्वावर शोककळा ! ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित कालवश

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

Multibagger Stock : फक्त 7 महिन्यांत दुप्पट पैसे! Nifty500 मधील हे 5 शेअर्स ठरले गुंतवणूकदारांसाठी सोने!

SCROLL FOR NEXT