मुंबई

तपास यंत्रणांनी सर्व बाजूने तपास केला नाही

CD

तपास यंत्रणांनी सर्व बाजूने तपास केला नाही
स्फोटामागे सिमीचा हात असल्याचा दावा फेटाळताना न्यायालयाचे निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या मागे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेचा हात असल्याचा आरोपींचा दावा विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे, मात्र या प्रकरणाचा तपास करताना तपास यंत्रणांनी प्रत्येक बाजूने तपास केला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी आपल्या १,०३६ पानांच्या निकालात म्हटले आहे की, बॉम्बस्फोटाचे ठिकाण सिमीच्या कार्यालयाजवळ असतानाही, तपास यंत्रणा सिमीच्या सहभागाची शक्यता तपासण्यात अपयशी ठरली. तत्कालीन तपास अधिकारी मोहन कुलकर्णी यांनी चौकशीत हे मान्य केले की, स्फोटाच्या परिसरात सिमीचे कार्यालय होते. तरीही, त्यांनी सिमीचे कार्यालय त्या वेळी कार्यरत होते का? किंवा त्यांचे सदस्य तिथे उपस्थित होते का?, याची चौकशी केली नाही.
न्यायालयाने हे स्पष्ट केले की, जरी सिमीचा सहभाग नसल्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटली असली तरी, काही तथ्ये समोर आल्यास त्या दिशेने तपास करणे आवश्यक होते. त्यामुळे आरोपींच्या वकिलांनी केलेला सिमीच्या सहभागाचा दावा न्यायालयाने फेटाळला असला तरी, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; मात्र सिमीच्या कार्यकर्त्यांचा स्फोटात सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपींचा दावा फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT