मुंबई

फ्लॅटच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक : बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल नवी मुंबई (वार्ताहर) – उलवे सेक्टर-१७ येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट विक्रीच्या आमिषाने मुंबईतील एका तरुणाकडून तब्बल ३१ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुलतान सिराजउद्दीन यासिन याच्याविरोधात उलवे पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या प्रशांत पाटील (२८) हे चिंचपोकळी, मुंबई येथे राहतात. त्यांना स्वतःचा फ्लॅट खरेदी करायचा असल्याने त्यांनी एप्रिल २०२० मध्ये सुलतान यासिनच्या डिव्हाईन डाल्फिन इंटरप्रायझेस या कंपनीमार्फत उलवे सेक्टर-१७ येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. २०२ घेण्याचा निर्णय घेतला. सुलतान यासिन याने संबंधित फ्लॅट बाजारभावापेक्षा कमी दरात विकण्याचे आमिष दाखवून प्रशांत यांचा विश्वास संपादन केला. फ्लॅटचे बांधकाम अपूर्ण असतानाही प्रशांत व त्यांच्या कुटुंबीयांनी रोख व आरटीजीएसद्वारे ३१ लाख रुपये सुलतान यासिन याला दिले. मात्र, व्यवहार झाल्यानंतर केवळ साठेखत करण्यात आली आणि फ्लॅटचा ताबा दिला गेला नाही. प्रशांत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र सुलतान यासिन वेळकाढूपणा करीत राहिला. अखेर मार्च २०२५ मध्ये रक्कम परत मागितल्यावर त्याने ४७ लाखांचा चेक दिला, जो वटला नाही. नंतर प्रशांत यांना समजले की, संबंधित फ्लॅट दुसऱ्यालाच भाड्याने दिला गेला आहे. शिवाय, सुलतान यासिनने याच फ्लॅटसंदर्भातील माहिती लपवून मुंबई उच्च न्यायालयातून दुसऱ्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन घेतला होता. या प्रकारामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर प्रशांत पाटील यांनी उलवे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुलतान यासिन याच्याविरोधात फसवणूक, विश्वासघात व अपहाराचे कलम लावून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

CD

फ्लॅटच्या प्रलोभनाने ३१ लाखांची फसवणूक
बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) ः उलवे सेक्टर-१७ येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट विक्रीच्या प्रलोभनाने मुंबईतील एका तरुणाकडून तब्बल ३१ लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुलतान सिराजउद्दीन यासिन याच्याविरोधात उलवे पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या प्रशांत पाटील (वय २८) हे चिंचपोकळी, मुंबई येथे राहतात. फ्लॅट खरेदी करायचा असल्याने पाटील यांनी एप्रिल २०२०मध्ये सुलतान यासिनच्या डिव्हाइन डॉल्फिन इंटरप्रायझेस या कंपनीमार्फत उलवे सेक्टर-१७ येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. २०२ घेण्याचा निर्णय घेतला. सुलतान यासिन याने संबंधित फ्लॅट बाजारभावापेक्षा कमी दरात विकण्याचे प्रलोभन दाखवून प्रशांत यांचा विश्वास संपादन केला. फ्लॅटचे बांधकाम अपूर्ण असतानाही प्रशांत व त्यांच्या कुटुंबीयांनी रोख व आरटीजीएसद्वारे ३१ लाख रुपये सुलतान यासिन याला दिले. हा व्यवहार झाल्यानंतर केवळ साठेखत करण्यात आले आणि फ्लॅटचा मात्र ताबा दिला गेला नाही.
प्रशांत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र सुलतान यासिन वेळकाढूपणा करीत राहिला. अखेर मार्च २०२५मध्ये रक्कम परत मागितल्यावर त्याने ४७ लाखांचा चेक दिला, जो वटलाच नाही. नंतर प्रशांत यांना समजले, की संबंधित फ्लॅट दुसऱ्यालाच भाड्याने दिला आहे. शिवाय सुलतान यासिनने याच फ्लॅटसंदर्भातील माहिती लपवून मुंबई उच्च न्यायालयातून दुसऱ्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन घेतला होता. या प्रकारामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर प्रशांत पाटील यांनी उलवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुलतान यासिन याच्याविरोधात फसवणूक, विश्वासघात व अपहाराचे कलम लावून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed : वाल्मिक कराडचा राईट हॅंड गोट्या गितेसह ५ जणांना मोठा दिलासा, मकोका रद्द

Gokul Dairy Kolhapur : गोकुळ दूध संघाच्या ठरावावरून जोरदार राडा, अंगावर धावून जाण्याचा प्रकार; एका ठरावाला ५ लाख देण्याची भाषा, पन्हाळा तालुक्यातील घटना

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

Solar Eclipse 2025: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 'वृषभ' राशीसाठी कसं असणार आहे?

Kaas Pathar Satara : चक्क नो पार्किंगमध्येच 'पोलिस टोपी'चा रुबाब; कायद्याचे रक्षकच ठरले नियमभंग करणारे, कास पठारावरील प्रकार

SCROLL FOR NEXT