मुंबई

मेट्रोच्या खांबांना रंगीबेरंगी छटांचा साज

CD

मेट्रोच्या खांबांना रंगीबेरंगी छटांचा साज
-एमएमआरडीएकडून २,५३७ खांबांची रंगरंगोटी पूर्ण
मुंबई, ता. २ : मुंबईसह एमएमआरमध्ये गारेगार आणि वेगवान प्रवास करता यावा, यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. उन्नत मेट्रो मार्गासाठी सर्वत्र महाकाय मजबूत खांब उभारले आहेत. कुठे रस्त्याच्या मध्येच तर कुठे दोन्ही बाजूला असलेले हे खांब म्हणजे सुरुवातीला अडगळ वाटत होते. मात्र त्याला आता एमएमआरडीएने रंगीबेरंगी छटांचा साज चढवला आहे. त्यामुळे हे खांब आता कलाकृतींमध्ये रूपांतरित झाले आहेत. तसेच रंगावरून मेट्रो मार्गिकेची ओळखही पटणार आहे.
मेट्रो मार्गिकांसाठी आतापर्यंत एकूण २,९६२ खांब उभारण्यात आले आहेत. त्यापैकी ८६ टक्के म्हणजे २ हजार ५३७ खांबांवर संकल्पनाधारित रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या सौदर्यात मोठी भर पडत असून, प्रवाशांना रंगावरून मेट्रो मार्गिका ओळखण शक्य होणार आहे. एखादा मेट्रो मार्ग ‘रेड लाइन’ म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजवले आहेत. त्यामुळे त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल. दरम्यान, उर्वरित खांबांचे रंगकाम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

कोणत्या मार्गावर किती रंगकाम
- मेट्रो २ बी मार्गिका (डी. एन. नगर - मंडाळे) : एकूण ६५३ खांबांपैकी ६२३ खांबांवरील काम पूर्ण झाले. केवळ २५ खांबांचे रंगकाम बाकी आहे.
- मेट्रो ४ व ४ ए मार्गिका (वडाळा - कासारवडवली - गायमुख) : एकूण १,०२३ खांबांपैकी ८४१ खांब रंगविण्यात आले असून, १८२ खांबांचे काम बाकी आहे.
- मेट्रो ५ मार्गिका (ठाणे - भिवंडी - कल्याण) : ४८८ पैकी ४३० खांबांवर आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे, तर ५८ खांबांचे काम सुरू आहे.
- मेट्रो ६ मार्गिका (स्वामी समर्थ नगर - विक्रोळी) : एकूण ४२२ पैकी २८८ खांबांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १३४ खांब रंगवायचे आहेत.
- मेट्रो ९ मार्गिका (दहिसर (पूर्व) - मिरा - भाईंदर) : या मार्गिकेवरील काम अंतिम टप्प्यात असून, एकूण ३५४ खांबांपैकी ३२८ खांब रंगवण्यात आले आहेत. केवळ २६ खांबांचे काम शिल्लक आहे.
- मेट्रो ७ ए मार्गिका (अंधेरी पूर्व - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) : या मार्गिकेवरील सर्व २२ खांब रंगविण्यात आले आहेत.

मेट्रो मार्गाच्या खांबांच्या रंगकामाचा उपक्रम हा अत्यंत बारकाईने आणि काटेकोरपणे राबवला जात आहे. रंगानुसार आणि संकल्पनाधारित डिझाइन असलेल्या या खांबांमुळे प्रवाशांना आपले मार्ग ओळखण्यासाठी मदत होईल.
- डाॅ. संजय मुखर्जी,
आयुक्त, एमएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT