मुंबई

धसई गाव कचऱ्याच्या दुर्गंधीने त्रस्त

CD

टोकावडे, ता. ३ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील पहिले कॅशलेस गाव म्हणून ओळखले जाणारे धसई गाव सध्या कचरा, दुर्गंधीने त्रस्त झाले आहे. बाजार, महाविद्यालयीन रस्ता आणि जीप स्टँड परिसरात खुलेआम टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत तत्काळ कचरा साफ करावा, अशी मागणी केली आहे. ही समस्या लक्षात घेत मनसे पदाधिकाऱ्यांनीही ग्रामपंचायत धसईला निवेदन दिले आहे
धसईमध्ये दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारानंतर काही दुकानदार सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात. त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. कचऱ्यामुळे परिसर डम्पिंग ग्राउंडसारखा दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे मुरबाड तालुका आणि ग्रामस्थ सूरज रजपूत यांनी धसई ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले. याप्रसंगी मनसे उपतालुकाध्यक्ष आकाश दळवी, विभाग अध्यक्ष प्रणव भिडे, मनविसे तालुका सचिव गिरीश म्हाडसे हे उपस्थित होते. कचरा तातडीने उचलावा, दुकानदारांना कचरा टाकण्यास मज्जाव करावा, स्वच्छता कर्मचारी नियुक्त करून कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापन करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.

ग्रामपंचायत धसईच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत कचरा उचलून परिसर स्वच्छ केला नाही, तर गटविकास अधिकारी मुरबाड व मुख्याधिकारी ठाणे यांच्याकडे कारवाईची मागणी केली जाईल.
- अरुण वारघडे, मुरबाड तालुकाध्यक्ष मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT