गोविंदा विमा प्रक्रिया गुंतागुंतीची ः दिघे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : दहीहंडी उत्सवात लाखोंच्या दहीहंड्यातील लोणी चाखण्यासाठी थरांचा थरथराट अनुभवयाला मिळत असतो. मात्र, हेच थर कोसळून अनेक गोविंदा जखमी अथवा मृत्यू होत असतो. याची दाखल घेत, गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनाने मोफत अपघाती विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना स्वागतार्ह आहे. मात्र, प्रत्यक्षात यासाठीची प्रक्रिया अत्यंत किचकट व गुंतागुंतीचा असून लहान-मोठ्या गोविंदा पथकांसाठी अन्यायकारक असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केले.
दहीहंडी सणाला नवे रूप, नवा उत्साह देण्याचे कार्य धर्मवीर आनंद दिघे यांनी केले होते. त्यांनी दहीहंडी सणाला एक सांघिक ऐक्याचा आणि पराक्रमाचा उत्सव म्हणून समाजासमोर उभा केला. त्यामुळेच आज हा सण लाखो भाविकांच्या भावनांचा केंद्रबिंदू बनला आहे. या गोविंदा पथकांना अपघाती विमा योजना शासनाकडून लागू केली. या योजनेच्या एकाच फॉर्ममध्ये दोन वेळा मंडळाचे नाव, दोन मोबाईल नंबर आणि दोन ईमेल आयडी मागण्याचा अर्थ काय? हे सर्व गोंधळ निर्माण करणारे आहे.
प्रत्येक फील्डवर स्टार मार्क ठेवून जबरदस्तीने सर्व माहिती भरण्यास भाग पाडले जात आहे. एखाद्या माहितीचा अभाव असल्यास फॉर्म नाकारला जाणार का? मग ग्रामीण भागातील पथकांचे काय? मंडळाच्या लेटरहेडवरचा अर्ज आणि सर्व गोविंदांची यादी फक्त १ एमबीच्या पीडीएफमध्ये अपलोड करण्याची अट हास्यास्पद आहे. ग्रामीण भागातील मंडळांकडे अशी तांत्रिक साधने नसताना एवढ्या गुंतागुंतीच्या अटी लादणे म्हणजे सणाच्या आनंदावर पाणी फेरण्यासारखे आहे. ही योजना शासनाच्या निधीतून राबवली जात आहे, तर एवढ्या किचकट अटी असोसिएशनकडून का घालण्यात येत आहेत? हे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सण आहे, तो कोणत्याही बोगस नियमांच्या जोखडात अडकवू नका. गोविंदांचा विमा हा हक्क आहे, उपकार नाही. शासनाने तात्काळ या फॉर्ममधील गुंतागुंतीच्या अटी रद्द करून ओरिएंटल इन्शुरन्स कार्यालयात एक खिडकी योजना चालू करावी व सोपी प्रक्रिया लागू करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि शासन तसेच असोसिएशन जबाबदार राहतील, असा इशारा केदार दिघे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.