मुंबई

उच्चभ्रू राहणीमान पिढीला बचत, गुंतवणुकीचे धडे

CD

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बचत व गुंतवणूक या विषयासंदर्भात जनजागृती शिबिर घेण्यात आले. सेबी या संस्थेकडून या विद्यार्थ्यांना पैसा कसा वापरावा? बचतीसह गुंतवणूक कुठे करावी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आधुनिकतेकडे वाटचाल करणारी सध्याची पिढी ही उच्चभ्रू राहणीमानाकडे आकर्षित झाली आहे. यासाठी कमवत असलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसा हा खर्च केला जात आहे. त्यामुळे या पिढीला पैशांचे महत्त्व आणि भविष्य सुकर होण्यासाठी बचत आणि गुंतवणूक कशी करावी, या संदर्भात मार्गदर्शनाची आवश्यकता भासत होती. या अनुषंगाने बदलापूर पूर्वेकडील आदर्श महाविद्यालयात सीबी या संस्थेकडून या विद्यार्थ्यांना बचत व गुंतवणुकीचे धडे देण्यात आले. यावेळी बचत आणि गुंतवणूक यांच्यातील तुलनात्मक फायदे करत असताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने ही दूर करून विश्वासार्हता असणाऱ्या संस्था आणि स्कीममध्ये, पैशांची गुंतवणूक आणि बचत करण्यासंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून माहिती देण्यात आली. हे शिबिर तीन सत्रात गुरुवारी (ता. ३१) सकाळी ९ ते १२ या वेळेत झाले. या वेळी भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या सहाय्यक व्यवस्थापक मीनल मिस्त्री यांनी या विषयासंदर्भात माहिती देत चित्रफीत दाखवली. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या संगीता पांडे यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दक्ष हलकारे यांनी केले. या वेळी प्राध्यापक आत्माराम बांदल, मनोज जाधव, अमरेश कोटे, सचिन देढिया यांनी मेहनत घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT