मुंबई

मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

CD

मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
भांडुप, मुलुंड आणि अंधेरी भागात सर्वाधिक खड्ड्यांच्या तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : शहरात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. भांडुप, मुलुंड, मालाड, अंधेरी भागात खड्ड्यांच्या तक्रारी सर्वाधिक असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

मुंबईच्या शहर आणि उपनगरात रस्त्यांवर होणाऱ्या खड्ड्यांची जलदगतीने दुरुस्ती करण्यासाठी पालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अ‍ॅप जूनपासून नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरी सहभाग वाढविणे आणि खड्डे दुरुस्तीला वेग देण्यासाठी पालिकेने ही सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेमुळे खड्ड्यांच्या तक्रारी करणे सोपे झाल्याने मुंबईत विभागवार मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे वाढत्या तक्रारीवरून दिसून येत आहे. दरम्यान, खड्ड्यांसंदर्भात तक्रार आल्‍यानंतर ४८ तासांत तक्रारीचे निवारण होणे आवश्‍यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे जैसे थे आहेत. दुरुस्तीनंतरही खड्डे बुजले जात नाहीत. वाहतुकीच्या ताणामुळे दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे तक्रारी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
---------------------
विभागवार खड्डे
भांडुप पवई - १,४४५
मालाड - ७०८
दादर - ६२३
अंधेरी पश्चिम - ८२८
मुलुंड - ५८२
भायखळा - ५९३
-------------
महामार्गावरही खड्डे
पश्चिम द्रुतगती महामार्ग ३,३८६
पूर्व द्रुतगती महामार्ग ३,४००
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार एक पाऊल पुढे... तनिष्का सोबत झाला साखरपुडा; मुंबईत रंगला भव्य सोहळा

Maharashtra Education : मराठी शाळांच्या सहभागाशिवाय 'विकसित महाराष्ट्र २०४७' व्हिजनची अंमलबजावणी कठीण

Kolhapur Circuit Bench Cases : १ लाख ७५ हजार खटले सर्किट बेंचकडे येणार, दोन न्यायाधीशांचे बेंच, जनहित याचिकाही शक्य होणार

रस्त्यावर पहाटे ४ पर्यंत दारूच्या नशेत लोळत पडलेला असायचा अभिनेता; पोलीस पकडायचे आता आहे अफाट श्रीमंत

Latest Marathi News Updates Live : सांगलीतील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन चिघळलं

SCROLL FOR NEXT