मुंबई

शेअर रिक्षांच्या दरवाढीने प्रवासी हैराण

CD

शेअर रिक्षांच्या दरवाढीने प्रवासी हैराण
कांजूरमार्गमध्ये रिक्षाचालकांची मनमानी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : शेअर रिक्षांची मनमानी पद्धतीने दरवाढ करून कांजूरमार्ग पूर्वेला रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. कांजूरमार्ग पूर्व ते कामगार आघाडी या अंतरासाठी १० रुपये शेअर रिक्षाचा दर अचानकपणे वाढवत १५ रुपये केल्याने प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कांजूरमार्ग पूर्व ते कामगार आघाडी या ठिकाणी ये-जा करणाऱ्या शेअर रिक्षांचे भाडे प्रतिव्यक्ती १० रुपये आकारण्यात येत होते. मात्र कोणतीही सूचना न देता स्थानिक रिक्षाचालकांनी आता ते भाडे थेट १५ रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. याबाबत नागरिकांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, या मनमानी दराबाबत स्वाक्षरी मोहीमदेखील राबवली. हे स्वाक्षऱ्यांचे पत्र वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात देण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप या मनमानी दरवाढीवर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दरवाढीचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने समर्थन केले असून, या दरवाढीविरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या बाजूने उतरला आहे. त्यामुळे दरवाढीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नियमानुसार रिक्षा भाडे घ्या
अचानपणे करण्यात आलेल्या या पाच रुपये दरवाढीबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी विभाग अध्यक्ष तानाजी मोरे यांनी केली आहे. शेअर रिक्षाचालक नियम पाळत नसल्‍यास शेअर रिक्षा बंद करून प्रादेशिक परिवहन नियमानुसार मीटर रिक्षा सुरू कराव्यात, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Latest Marathi News Live Update: नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला

SCROLL FOR NEXT