मुंबई

लालजी पाडा मुख्य मार्गात साचते पाणी

CD

लालजी पाडा मुख्य मार्गात साचतेय पाणी
वाहनचालकांसह प्रवासी, स्थानिक रहिवासी हैराण
कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेला शिवशंकर एसआरए, लालजी पाडा, मंगूभाई दत्तानी रोड पुलाजवळील मुख्य मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. येथील रस्‍त्‍याचे निकृष्‍ट काम झाल्‍याने पाणी साचत असल्‍याचा आरोप रहिवासी करीत आहेत.
पालिकेने तातडीने योग्य कारवाई करून मार्गाची डागडुजी करावी, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश घाग, प्रमोद घाग यांनी केली आहे. लालजी पाड्यातील हा मुख्य मार्ग न्यू लिंक रोडपासून थेट कांदिवली रेल्‍वेस्‍थानकाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडतो. त्‍यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते. या मार्गात सखोल भाग, उंचवटे आहेत. त्‍यामुळे सखल भागात मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांची दमछाक होते. शालेय विद्यार्थी आणि पालकांना जीव मुठीत घेऊनच पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. वाहनांचे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. तसेच स्थानिकांना दैनंदिन व्यवहारासाठी पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. याबाबत स्थानिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी पाण्याचा जलद गतीने निचरा होईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले

Mumbai Rent Rules: मुंबईत भाडे करार नियमात बदल, ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; नियम मोडल्यास 'इतका' दंड

kolhapur ZP: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

SCROLL FOR NEXT