मुंबई

काॅंग्रेसचे अड. प्रविण ठाकूर यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश

CD

ॲड. प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्‍थिती
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः अलिबाग मतदारसंघाचे माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांचे चिरंजीव व काँग्रेस नेते ॲड. प्रवीण ठाकूर यांनी शनिवारी (ता. २) शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात हा राजकीय प्रवेश मोठ्या उत्साहात झाला. या प्रवेशामुळे अलिबाग व रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या वेळी माणगाव येथील शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, तसेच बेलोशी व माणकुळे ग्रामपंचायतींचे सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. मंचावर खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, अशोक भोपतराव, ऋषिकांत भगत, उमा मुंढे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष असून, आम्ही प्रत्येक नवनिर्वाचित नेत्याचा सन्मान करतो. ॲड. प्रवीण ठाकूर हे त्यांच्या वडिलांच्या राजकीय वारशाचे योग्यरित्या पुढे नेत असून, त्यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाची पक्षाला नितांत गरज आहे. प्रवेशानंतर बोलताना ॲड. प्रवीण ठाकूर यांनी सांगितले की, अलिबागमधील रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आम्ही महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. खासदार सुनील तटकरे यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे. याच दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे अलिबागमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्तरावर नवसंजीवनी मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT