मुंबई

नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच खरे कर्तव्य

CD

नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच खरे कर्तव्य
प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांचे स्पष्ट मत
रोहा, ता. ३ (बातमीदार) ः महसूल विभागाकडे नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या असतात. नागरिक कार्यालयात छोट्या-छोट्या कामांसाठी येतात; पण त्यांच्या दृष्टीने त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांनी ही जबाबदारी ओळखून त्यांच्या गरजांसाठी तत्पर असले पाहिजे, असे ठाम मत रोह्याचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी व्यक्त केले.
रोहा येथील महसूल दिन आणि महसूल सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. घर पडल्यावर अधिकारी पोहोचायला हवेत, शेतीचे नुकसान झाल्यावर त्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे लागेल. सातबारा, दाखले यांसाठी लोक फिरू नयेत, यासाठी तत्परतेने सेवा देणे हाच खरा प्रशासनाचा धर्म आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी खुटवड होते. पालीच्या प्रांताधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार किशोर देशमुख, पालीचे तहसीलदार उत्तम कुंभार, भूमी अभिलेख उपअधीक्षक योगेश कातडे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पालीचे तहसीलदार उत्तम कुंभार, नायब तहसीलदार नीलेश गावणकर, राजेश थोरे, ज्ञानेश्वर अडसूळ, मंडळ अधिकारी संजय बुरंभे, महसूल सहाय्यक पूजा जोशी, धर्माजी लेंडी, योगेश पवार यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिपाई अमोल लोखंडे व नायब तहसीलदार पुंडलिक मोकल यांनाही जिल्हा स्तरावरील महसूलसेवेबद्दल विशेष गौरव मिळाला. कार्यक्रमात तहसीलदार किशोर देशमुख यांनी महसूल सप्ताहाची माहिती देताना कर्मचाऱ्यांनी जनतेविषयी अधिक संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कामात कसूर झाल्यास टीका होते, माध्यमांत ‘नो कंट्रोल’ अशी टिप्पणी होते, त्यामुळे सेवा आणि कर्तव्याचे भान प्रत्येकाने ठेवावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT