मुंबई

रिक्षाचालकाला पावणे दोन लाखांचा गंडा

CD

रिक्षाचालकाला पावणेदोन लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ऑफिसमधील मॅडम यांना सोने तोलण्याचा वजनकाटा पाहिजे, असे म्हणत विश्वास संपादन करत उपवन, कोकणीपाडा येथील रिक्षाचालक लहू भोंडीवले यांना एका ग्राहकाने सुमारे पावणेदोन लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. त्या ग्राहकाने रिक्षाचालकाची १७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी घेऊन मोठ्या चलाखीने पोबारा केला. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रिक्षाचालक भोंडीवले हे बुधवारी (ता. ३०) सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन निघाले. वागळे इस्टेट पासपोर्ट ऑफिसजवळ ते थांबले असताना एक ग्राहक त्यांच्याजवळ आला. पासपोर्ट ऑफिसच्या इमारतीमध्ये मी नोकरी करत असल्याचे सांगून त्याच्या मॅडम यांना सोने तोलण्याचा वजन काटा पाहिजे आहे. त्याच्यासाठी ठाणे स्थानकात जायचे असल्याचे सांगितले. ठाणे स्थानकात जाताना नितीन कंपनीजवळ आल्यावर त्या ग्राहकाने रिक्षा माजिवडा येथे घेण्यात सांगितले. त्यानुसार रिक्षा वळवून तेथून गांधीनगर पोखरण २ येथे रिक्षा घेण्यास सांगितले. तेथे गेल्यावर त्याने पाचशे रुपये दिले. म्हणाला, की या मार्केटमधील सोन्याचे दुकान बंद आहे. आपण दुसरीकडे जाऊ, असे सांगत त्याने कळवा-विटावा येथे जायचे, असे म्हटले. त्याचप्रमाणे रिक्षा कळवा नाका येथे घेऊन गेल्यावर त्यांनी पुन्हा पाचशे रुपये दिले. तसेच येथील मार्केटमध्ये त्याचे दुकान असून तेथून सोने तोलण्याचा काटा घेऊन येतो. वजन करण्यासाठी सोन्याची वस्तू पाहिजे आहे. रिक्षाचालक लहू यांच्याकडे त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी वजन करण्यासाठी मागितली. विश्वास ठेवून रिक्षाचालकाने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दिल्यावर तो सोनसाखळी घेऊन तो पसार झाला. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT