मुंबई

रिपब्लिकन सेना ठाणे शहर अध्यक्ष पदी पंढरीनाथ गायकवाड यांची नियुक्ती

CD

रिपब्लिकन सेना शहर अध्यक्षपदी पंढरीनाथ गायकवाड
ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) ः रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी पंढरीनाथ गायकवाड यांची रिपब्लिकन सेना ठाणे शहर अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. रिपब्लिकन सेनेने शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षासोबत नुकतीच युती केली आहे.
पंढरीनाथ गायकवाड यांची आंबेडकरी समाजातील काम पाहता रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब चासकर यांच्या शिफारसीनुसार आंबेडकर यांनी त्यांच्यावर ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. याप्रसंगी रिपब्लिकन सेना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बावधनकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे, महाराष्ट्र प्रदेश नेते प्रा. सुनील वाकेकर, विद्यार्थी सेना मुंबई अध्यक्ष आशीष गाडे, ठाणे जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे, ठाणे जिल्हा सल्लागार डॉ. पद्माकर तायडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे नवी मुंबई ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर खोपडे, रिपब्लिकन कामगार सेना ठाणे जिल्हा सरचिटणीस भिमराव गवई, रिपब्लिकन कामगार सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव आडे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मिर्के, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम शिनगारे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग कनकुटे, ठाणे जिल्हा सचिव राम गायकवाड, वाशी एपीएमसी मार्केट युनिट अध्यक्ष अनंत पारदुले, सचिव विनित उबाळे, उल्हासनगर शहर (जिल्हा) अध्यक्ष ॲड. महेंद्र निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी गायकवाड यांना ठाणे शहरातील संपूर्ण प्रभाग कमिट्या बांधण्याचे आदेश देत आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश आंबेडकर यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरची भीती! लष्कर-ए-तैयबाने POK तून 'या' ठिकाणी हलवले दहशतवाद्याचे ट्रेनिंग कॅम्प...

Latest Marathi News Live Update : धास्ती! शनिवार, रविवारी पुन्हा झोडपणार; सोलापूरसह २२ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

DMart मध्ये कोणत्या वस्तूंवर किती GST लागतो? खरेदीसाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, नाहीतर…

Kolhapur Ambabai : भरपावसातही अंबाबाई दर्शनासाठी ‘भक्ती’चा पूर, पाचव्या माळेला दोन लाख २३ हजार भाविकांनी घेतले दर्शन

Beed News: तरुणाच्या खूनप्रकरणी एकास कोठडी; बीडमध्ये अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, जबाबात आणखी तिघांची नावे

SCROLL FOR NEXT