मुंबई

ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गंगा – बॅ. अंतुले

CD

बॅ. अंतुले यांच्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा
मुरूड, ता. ३ (बातमीदार) ः बॅ. ए. आर. अंतुले यांचे वादळी व्यक्तिमत्त्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचा प्रभाव इतर राज्यांपर्यंत होता. त्यांची दूरदृष्टी आणि शिक्षणविषयक बांधिलकीमुळे श्रीवर्धन व मुरूडसारख्या ग्रामीण भागातही उच्च शिक्षणाची गंगा अवतरली, असे गौरवोद्गार वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित सेवापूर्ती समारंभात मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांनी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या महाविद्यालयाचा प्रारंभ खडतर परिस्थितीत झाला होता, पण कोकण उन्नती मित्र मंडळाच्या प्रयत्नांतून आज एक भव्य वास्तू उभी राहिली आहे. हे महाविद्यालय मुरूडकरांनी आपलेच मानले पाहिजे. ही भावना व प्रेम पुढेही जपले गेले पाहिजे, असे अंतुले यांनी सांगितले. या वेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात प्रा. मुरलीधर गायकवाड, अधीक्षक संदेश दांडेकर व मुख्य लिपिक महित हासवारे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी नगरसेवक प्रमोद भायदे, महाविद्यालय समिती अध्यक्ष ॲड. इस्माईल घोले, वासंती उमरोटकर, सीए अशोक जोशी, डॉ. विश्वास चव्हाण, मुग्धा दांडेकर, विजय पैर आणि प्राचार्य जे. बी. कांबळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना प्राचार्य जे. बी. कांबळे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून या कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून त्यांचे विशेष आभार मानले. सीए अशोक जोशी यांनी भव्य वास्तूचा उपयोग विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी व्हावा, अशी सूचनाही केली. कार्यक्रमात मुश्ताक अंतुले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT