मुंबई

संघटित गुन्हेगारीला पोलिसांचा ‘ब्रेक’

CD

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये काही महिन्यांपासून गुन्हेगारी प्रवृत्तींचा त्रास वाढत असताना, परिमंडळ ४चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काच्या माध्यमातून धडक कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याने गुन्हेगारी विश्वात वावरणाऱ्या एका टोळी प्रमुखासह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमअंतर्गत कडक कारवाई केली आहे.
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटक केलेले गौतम वानखेडे (वय २१) आणि रोहन वाघमारे (वय १९) हे आहेत. विशेष बाब म्हणजे या गुन्ह्यात एक १७ वर्षीय विधी संघर्षित बालकही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान वानखेडे याने विविध साथीदारांच्या मदतीने एक संघटित गुन्हेगारी टोळी उभी करून शहरात अनेक गंभीर गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडे असलेल्या गुन्हेगारी अभिलेखानुसार त्याच्या टोळीच्या हालचालींमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
टोळीच्या कृत्यांवर आवर घालण्यासाठी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याने मोक्काअंतर्गत गुन्ह्यात कलम समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शहरात वाढणाऱ्या संघटित गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळेत रोखणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. अल्पवयीन आणि तरुण वयात गुन्ह्यांच्या वाटेवर वळणाऱ्या टोळ्यांना वेळीच रोखण्यासाठी मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर करत आहोत. ही कारवाई केवळ शिक्षा देण्यासाठी नव्हे, तर इतर तरुणांसाठी इशारा ठरावी, हा हेतू आहे. गुन्हे प्रकटीकरण पथक आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी काटेकोर तपास करत टोळी निष्प्रभ केली. अशी कारवाई पुढेही केली जाईल.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT