मुंबई

शेतीच्या कामादरम्यान सर्पदंशाची संख्या अधिक

CD

मनोर, ता. ४ (बातमीदार) : खरीप हंगामात शेतीची कामे सुरू झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांचा निसर्गाशी थेट संपर्क वाढल्याने सर्पदंश आणि विंचू चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पालघर पूर्वेकडील मनोर ग्रामीण रुग्णालयात मागील तीन महिन्यांत सर्पदंशाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात एकूण १०२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील १७ रुग्णांना गंभीर स्थितीत पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयांत पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत दररोज सरासरी एक सर्पदंशाचा रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. सर्पदंश झाल्याची तक्रार घेऊन आलेल्या रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन रक्ताची चाचणी करून विषारी आणि बिनविषारी दंश अशी वर्गवारी करून रुग्णांवर तातडीने औषधोपचार केले जात आहेत. गंभीर रुग्णांना तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात हलवले जाते. सर्पदंशाच्या एकूण १०२ रुग्णांपैकी १७ रुग्णांना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले.

लसींचा आवश्यक साठा उपलब्ध
पालघर पूर्वेच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असली, तरी सर्पदंशाच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात अँटी-स्नेक व्हेनम लसींचा साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे सर्पदंश झालेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सर्पदंश किंवा विंचूदंश झाल्यास रुग्णाला त्वरित नजीकच्या प्राथमिक अथवा ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे आवाहन मनोर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजगुरू यांनी केले.

सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना
- शेतीच्या कामावेळी गम बूट, हातमोजे यांचा वापर करावा.
- जंगल भागात काम करताना जागरूकता ठेवावी.
- सर्पदंश झाल्यास घरगुती उपचार न करता त्वरित रुग्णालय गाठावे.
- रुग्णांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

मनोर रुग्णालयातील सर्पदंशाच्या रुग्णांची माहिती
महिना सर्पदंश उपचाराचे रुग्ण एकूण
मे २२ ६ २८
जून २८ ५ ३३
जुलै ३५ ६ ४१
८५ १७ १०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT