मुंबई

परवानगी नसणाऱ्या खासगी व्हॅनचा विद्यार्थ्यांसाठी वापर

CD

उल्हासनगर, ता. ३ (बातमीदार) : परमिट आणि परवानगी नसणाऱ्या खासगी व्हॅनचा विद्यार्थ्यांसाठी वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक आरोप युवासेना शहरप्रमुख सुशील पवार यांनी कल्याण आरटीओ व उल्हासनगर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय पोवार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. अशा व्हॅनच्या मालकांवर व वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यां‍नी केली आहे.
शहरात शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी खासगी व्हॅनचा वापर केला जात आहे. त्या व्हॅनला परमिट व परवानगी नाही. तसेच व्हॅनच्या वाहनचालकाकडे परवाना नाही. वाहनचालकावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे की नाही, याची पोलिस तपासणी करत नाहीत. विशेष म्हणजे काही शाळांनी विद्यार्थ्यांना घरून अर्ज भरण्यास सांगितले. त्यात व्हॅनबाबत शाळेबाहेर काही घडल्यास त्याची जबाबदारी शाळेची नाही, असे नमूद केले आहे. हा प्रकार गंभीर असून व्हॅनमालकांवर व चालकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार, असे आश्वासन सहाय्यक पोलिस आयुक्त विजय पोवार यांनी दिले. याप्रसंगी सचिव शिवम साळवे, उपशहराध्यक्ष प्रवीण करीरा, किंगली आवळा, रवी वर्मा आदी पस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT