मुंबई

स्वस्तात एसआरएचा फ्लॅट देण्याच्या आमिषाने फसवणूक

CD

स्वस्तात एसआरएचा फ्लॅट देण्याच्या आमिषाने फसवणूक
अंधेरी, ता. ४ (बातमीदार) ः जोगेश्वरीतील मसाजवाडी, स्वप्नपूर्ती या एसआरए सहकारी सोसायटीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची दोन भामट्यांनी सुमारे १४ लाख रुपयांची फसवणूक केली. या दोन्ही भामट्याविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वैभव बाबूभाई क्षीरसागर आणि गोवर्धन वाय सालियन अशी या दोघांची नावे आहेत. त्‍यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. परेश नानजी गाला हे जोगेश्वरी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहेत. त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायची होती. दलालीचे काम करणाऱ्या वैभव क्षीरसागरला त्यांनी वन रुम किचन फ्लॅटबाबत विचारणा केली होती. त्याने जोगेश्वरीतील मसाजवाडी, स्वप्नपूर्ती सहकारी सोसायटीचा एक फ्लॅट दाखविला होता. एसआरएमध्ये आपली ओळख असून स्‍वस्‍तात फ्लॅट देतो, असे त्‍याने सांगितले. त्याने ३५ लाखांमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी वैभवने त्यांची ओळख गोवर्धनशी करुन दिली. या दोघांवर विश्वास ठेवून त्यांनी फ्लॅटसाठी १५ लाख ३० हजार रुपये दिले होते. त्‍यानंतर फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा, दस्‍तऐवज दिले नाही.
वारंवार विचारणा करुनही ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा नाद सोडून फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी त्याला दीड लाखांचा धनादेश दिला, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT