मुंबई

श्रावण महिन्यात फळांना मागणी वाढली

CD

श्रावणामुळे फळांच्या मागणीत वाढ
शिमला सफरचंद, पेर आणि सीताफळाचे भाव वाढले
जुईनगर, ता. ३ (बातमीदार) ः हिंदू धर्मातील श्रावण महिना उपवास व पारंपरिक सात्विक आहारासाठी प्रसिद्ध आहे. या काळात बहुसंख्य नागरिक विविध व्रते, उपवास करतात आणि परिणामी फळांचा वापर वाढतो. याच पार्श्वभूमीवर सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान, साठवणुकीची अडचण व वाहतूक विस्कळित झाली आहे. त्यामुळे फळांचा पुरवठा कमी झाला असून, उपलब्ध फळांना मागणी वाढल्याने भावही चढे झाले आहेत. विशेषतः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शिमला सफरचंद, काश्मीर पेर आणि महाराष्ट्रातील सीताफळ यांना मोठी मागणी आहे.
हिमाचल प्रदेशातील शिमला सफरचंदांची आवक सध्या रोज १० ट्रक इतकी होत आहे. याचे भाव ३० किलोच्या पेटीसाठी २१०० ते ३५०० रुपये दरम्यान आहेत. रसाळ आणि ताजी सफरचंदे बाजारात आल्याने ग्राहकांचा कल याकडे वाढला आहे. सफरचंदाचा मौसम ऑक्टोबरपर्यंत चालतो. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, श्रावणात उपवासामुळे शिमला सफरचंदाचा खप वाढत असून, पारंपरिक आहाराऐवजी लोक फळे खाणे पसंत करत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे भाव किंचित जरी चढे वाटले, तरीही धार्मिक भावनेने प्रेरित होऊन उपवासात फळ खाण्याकडे कल वाढल्यामुळे फळ बाजाराला श्रावण महिन्यात विशेष बूस्ट मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
.................
काश्मीर पेर (नाशपती) :
प्रतिदिन २-५ ट्रक फळांची आवक
१४-१६ किलो पेटीमागे ९०० ते १५०० रुपये भाव
श्रावणात विशेष मागणी
ऑक्टोबरपर्यंत मौसम सुरू
......................
सीताफळ :
पुणे, नगर, सासवड, जेजुरी आदी भागांतून आवक
प्रतिकिलो भाव ५० ते २०० रुपये
जुन्नर, सातारा, सोलापूर, कोल्हापूरमधून प्रमुख आवक
महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये उत्पादन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : २४ तासांत आणखी टॅरिफ लावणार! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा भारताला धमकी....

Latest Maharashtra News Updates Live : अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी बीडमध्ये बॅनर वॉर

मी ज्या नोटांवर नाचले त्या खोट्या... बेस्टच्या पार्टीमधील व्हिडिओवर माधवी जुवेकरचं स्पष्टीकरण; म्हणाली, 'फक्त माझ्याच बातम्या...

ENG vs IND: शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यातून 'या' दोन खास गोष्टी घेऊन जाणार; फोटो आले समोर

Mumbai Local: आता लोकलचा वेग आणखी वाढणार! प्रशासनाकडून या मार्गांवरील वेगमर्यादा शिथिल

SCROLL FOR NEXT