मुंबई

पुनर्विकासासाठी बेमुदत उपोषण

CD

पुनर्विकासासाठी बेमुदत उपोषण
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : चौदा वर्षे उलटूनही कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहतीतील नागरिकांची पुनर्विकास प्रकल्प पूर्ण न झाल्याने फरपट सुरू आहे. हा प्रकल्प रखडण्यास कारणीभूत असलेल्या विकसकावर गुन्हे दाखल करावे, रहिवाशांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या बाधित नागरिकांसह कल्याणच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला काॅलेज परिसरात कोकण वसाहत माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास उत्पन्न गट, मध्यमवर्गीय, उत्पन्न गट, उच्चतम उत्पन्न गट या गटवारीनुसार लोकांनी ३५ वर्षांपूर्वी म्हाडाअंतर्गत घरे घेतली. सुमारे १४ वर्षांपूर्वी पुनर्विकासाच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या विकसकांनी कोकण वसाहतीतील पुनर्वसन बाधित सदनिकाधारकांना वाढीव क्षेत्रासह बहुमजली इमारतीत सदनिका, तसेच सदनिका पूर्ण होण्याच्या कालावधीपर्यंत घरभाडे देणार असे सांगितले होते; मात्र सुमारे १४ वर्षे होऊनदेखील घरभाडे अन् घरदेखील नाही. त्यामुळे आपली फरपट होत असून काहींवर घरभाडे भरण्याचा आर्थिक बोजा पडत आहे. याबाबत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुमारे १,६०० पुनर्विकास प्रकल्पबाधित सदनिकाधारकांच्या पाठीशी उभे राहत पोलिस उपायुक्त कार्यालयालगत रविवारी (ता. ३) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास प्रचंड प्रतिसाद लाभला असून समाजातील सर्वच वर्गातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. शनिवारी शिंदे गट शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT