मुंबई

वृद्धाची तलावात आत्महत्या

CD

वृद्धाची तलावात आत्महत्या
कर्जत, ता. ३ (बातमीदार) : नेरळ येथील राजबाग या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाने जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. जनार्दन नारायण गायकवाड (वय ८५) असे या वृद्धाचे नाव असून त्यांनी जिजामाता भोसले तलावात उडी घेऊन रविवारी (ता. ३) सकाळी आपले जीवन संपवले.
जिजामाता भोसले तलावात मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. या मृतदेहाच्या कपड्यामध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये ‘आयुष्याला कंटाळलो आहे, स्वतःहून जीवन संपवत आहे’ असे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांनी राजबाग या सोसायटीमध्ये राहत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले. दरम्यान वयोमान, एकटेपणा आणि भावनिक तणावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास नेरळ पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT