मुंबई

मंडळ अधिकारी, तलाठी रास्त भाव दुकानांच्या भेटीला

CD

किन्हवली, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी सोमवार व मंगळवारी या दोन दिवशी आपली दुकाने सुरू ठेवून प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिला आहे. या दिवशी मंडळ अधिकारी व तलाठी संबंधित दुकानांना भेटी देऊन केवायसीच्या कामांची पाहणी करतील.
सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी; तसेच त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १०० टक्के ई-केवायसी प्रामाणिकीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, ई-केवायसी प्रक्रियेबाबतचा ऑनलाइन अहवाल पाहता तालुक्यातील बहुसंख्य दुकानदाराने वारंवार सूचना देऊनही ई-केवायसीचे काम पूर्ण केलेले नाही. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी याप्रकरणाची गांभीर्याने नोंद घेतली असून, सर्व कार्डधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी डॉ. अमृता सूर्यवंशी, पुरवठा निरीक्षक गीतांजली गोरे आणि पुरवठा शाखेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याशिवाय, सोमवार (ता. ४) आणि मंगळवारी (ता. ५) या दिवशी दुकानदाराने पूर्णवेळ रास्त भाव धान्य दुकान सुरू ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

दुकानदारांपुढे अडथळ्यांची मालिका
ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्याचे नाव कमी होऊन त्याचे धान्य बंद होणार आहे. धान्याची प्रतवारी कमी झाल्यास कमिशन घटले, तर याचा आर्थिक फटका दुकानदाराला बसणार आहे. अनेक महिन्यांपासून सर्व्हरमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने ही पॉस मशीनचे कामकाज तासनतास ठप्प होते. अनेकदा ग्राहकांच्या घरी जाऊन केवायसी करण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु काही लाभार्थी त्याला प्रतिसादही देत नाहीत. काही आदिवासी वाड्या-पाड्यांवर नेटवर्क नसते. अशा एक ना अनेक कारणांमुळे दुकानदारांची मानसिकता असूनही केवायसी प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT