मुंबई

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

CD

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : शहराच्या कॅम्प तीनमधील मध्यवर्ती फ्लोवर लाइन चौकात शनिवारी (ता. २) रात्री अचानक जलवाहिनी फुटली. यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर साचले. या घटनेमुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून गेले, तर दुसरीकडे वाहतूक व्यवस्था कोलमडली. अचानक फुटलेल्या जलवाहिनीमुळे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शनिवारी रात्री उशिरा फॉलोवर लाइन चौकात जलपुरवठा करणारी मुख्य वाहिनी फुटली. ही जलवाहिनी रस्त्याच्या मध्यभागीच असल्यामुळे काही मिनिटांतच चौक जलमय झाला. रस्त्यावर चार ते पाच फूट उंच पाणी उडत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता, काही दुचाकीस्वारांना मधोमधच आपली वाहने थांबवून बाजूला सरकावे लागले. अनेकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या जलपुरवठा विभागावर तीव्र संताप व्यक्त केला. “दर काही महिन्यांनी जलवाहिनी फुटते, लाखो लिटर पाणी वाया जाते, पण तरीही प्रशासन गांभीर्याने घेत नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी तर या जलवाहिनीच्या वारंवार फुटण्यामागे निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि देखरेखीतील हलगर्जीचे कारण सांगितले. अखेर सकाळी वाहिनी दुरुस्त केली. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शहरात वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना कधी करणार,” असा सवाल आता शहरवासीय विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT