मुंबई

न्यायालयाच्या उद्घाटनासाठी अंबरनाथ सज्ज !

CD

न्यायासाठीच्या विलंबाला पूर्णविराम
अंबरनाथ न्यायालयाचे ९ ऑगस्टला उद्घाटन; न्यायाधीशांकडून पाहणी
शीतल मोरे ; सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ ता. ४ : शहरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्णत्वास येत आहे. अंबरनाथमधील नवीन न्यायालयाचे उद्घाटन येत्या ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांच्या पथकाने नुकतीच न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली. न्यायालयाची नवीन इमारत आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे. न्याय प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकांसाठी सहजसुलभ व्हावी, यासाठी हे पाऊल उचलले आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू केल्या असून, याचाच पाहणी दौरा शनिवारी (ता. २) पार पडला. या पाहणीदरम्यान न्यायाधीशांनी इमारतीतील विविध दालनांची व सुविधांची माहिती घेतली. न्यायालयाच्या कार्यप्रणालीत अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. स्थानिक नागरिक व वकील संघटनेत या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे. न्यायालय सुरू झाल्यानंतर ठाणे किंवा कल्याणला न जाता आता अंबरनाथमधूनच न्यायाची दारे खुली होणार असून, हजारो नागरिकांचा वेळ आणि पैसा यामुळे वाचणार आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची झपाट्याने वाढ होत आहे. दोन्ही शहरात विकासाबरोबरच गुन्हेगारीसुद्धा वाढत आहे. दरम्यान, या दोन शहरात एखाद्यावर अन्याय झाल्यास त्याला न्यायासाठी उल्हासनगर येथील कोर्टात जावे लागे; मात्र आता नागरिकांची ही प्रतीक्षा संपली असून, लवकरच अंबरनाथमध्येच न्यायालय सुरू होत असून, येत्या ९ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पूर्व चिखलोली येथील न्यायालयीन परिसरात न्यायालयाचे उद्घाटन आयोजित केले आहे.

सकाळी साडेदहा वाजता उद्घाटन होताच कार्यालयीन कामकाजसुद्धा सुरू होणार आहे. यानिमित्ताने कार्यक्रम व न्यायालयाच्या नवीन इमारतीची पाहणीसाठी ठाणे जिल्हा न्यायाधीश, कल्याण जिल्हा न्यायाधीश तसेच उल्हासनगर वकील संघटनेचा पाहणी दौरा केला. शनिवारी ठाणे जिल्हा, कल्याण जिल्हा न्यायाधीशांचे पथक, अधिकारी, वकील संघटना, पोलिस अधिकारी यांनी हा पाहणी दौरा केला. या वेळी न्यायाधीश मोहिते, न्यायाधीश भन्साळी, न्यायाधीश पवार, तसेच कल्याणचे जिल्हा न्यायाधीश अस्तुरके यांनी उद्घाटन कार्यक्रमाची रूपरेषा, सुरक्षेचा आढावा, मंडप व्यवस्था, पाहुण्यांची बैठक व्यवस्था, अल्पोहार, जेवण यासंदर्भात पाहणी केली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार ‘न्याय आपल्या दारी’ अंबरनाथ कोर्टाची स्थापना केली असून, सर्व नागरिकांना याचा लाभ मिळावा, योग्य न्याय मिळावा तसेच नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये या दृष्टीने हा पाहणी दौरा आयोजित केला होता.

युद्धपातळीवर काम सुरू
दरम्यान, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा न्यायालय ठाणे, जिल्हा न्यायालय कल्याण तसेच उल्हासनगर तालुका वकील संघटनांचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलिस यंत्रणाही जोरदार कामाला लागली आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिकारी, वकील, विविध विभागाचे अधिकारी यांची न्यायाधीशांनी बैठक घेतली. या बैठकीत उपस्थितांना समस्या, महत्त्वाच्या सूचना, तसेच इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याच्या सूचना यासंदर्भात ही बैठक घेतली होती. दरम्यान, हा उद्घाटन सोहळा भव्य व्हावा, या अनुषंगाने नायब अधिकारीदेखील या वेळी उपस्थित होते. हा उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या पार पडावा यासाठी अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वकील संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : इंधन वाहतूक सुरळीत,पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी नाही

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT