मुंबई

सिम्बाच्या जोडीला रॉकी, चॅम्प

CD

सिम्बाच्या जोडीला रॉकी, चॅम्प
ठाणे पोलिस दलात चार नवीन श्वान दाखल

पंकज रोडेकर ; सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठाणे शहर पोलिस दलात सिम्बाच्या जोडीला आता रॉकी, चॅम्प, जॅक आणि शॅडो या चार नव्या दमाच्या श्वानांची एण्ट्री झालेली आहे. हे श्वान सध्या आपआपल्या शोधक पथकात कर्तव्य बजाविण्यासाठी कसून बारकावे आत्मसात करत आहेत. येत्या काही दिवसांत ते दमदार कामगिरी करून पोलिस दलाची मान निश्चितच उंचावण्यासाठी सज्ज होतील. याशिवाय या चौघांमुळे श्वानांची संख्या नऊ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा मागोवा घेण्यास या श्वानांचा निश्चितच मदत होणार आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तलयाचे कार्यक्षेत्र हे ठाणे शहरापासून भिवंडी, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर-विठ्ठलवाडी ते थेट अंबरनाथ-बदलापूर असे पसरले आहे. सध्याच्या घडीला या शहरात वाढत्या नागरीकरणामुळे मोठी भाऊगर्दी होऊ लागली आहे. वाढत्या आणि दाटीवाटीच्या लोकवस्तीने गुन्ह्यांचे प्रमाणही वाढू लागल्याचे दिसत आहे. मग त्यामध्ये चोरीसारखे गुन्हे, या अमली पदार्थ, या गुन्ह्याचा आलेख उंचावत आहे. यामुळे दाखल असलेल्या श्वान पथकांवर कळत-नकळत ताण वाढल्याचे म्हटले जाऊ लागले. त्यातूनच नवे श्वान पोलिस दलात दाखल झाले आहेत. सध्या ते श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लवकरच ते पोलिस दलात दाखल होतील.

ठाणे शहर पोलिस दलात नुकतेच नवीन चार श्वानांची एन्ट्री झाली आहे. येत्या काही दिवसांत ते प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस सेवेत रुजू होतील. तसेच पोलिस दलात दाखल झालेल्या चार श्वानांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा मागोवा घेण्यास या श्वानांची निश्चित मदत होईल.
-अमरसिंह जाधव- उपायुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिस दल.

जुने आणि नवीन श्वानांची नावे/प्रकार
जुने श्वान/ प्रकार
सिम्बा/ अमली पदार्थ
बडी/स्फोटके शोधक
ब्रूनो/स्फोटके शोधक
स्टेला/गुन्हे शोधक
बेला/ गुन्हे शोधक
*नवीन श्वान/ प्रकार *
रॉकी/ गुन्हे शोधक
चॅम्प/गुन्हे शोधक
जॅक/अमली पदार्थ शोधक
शॅडो/स्फोटके शोधक

श्वान पथकाच्या ताकदीत भर
नव्याने दाखल झालेल्या श्वानांमध्ये रॉकी आणि चॅम्प हे दोन श्वान हे गुन्हे शोधक पथकाचे आहेत. यापूर्वी म्हणजे पाच श्वानांमध्ये ही स्टेला आणि बेला हे श्वान आहे. यामुळे गुन्हे शोधक श्वानांची चार झाल्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांचा उपयोग होईल आणि अशाप्रकारे ताकदीत भरही दिला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

Mumbai News: कबुतरखाना कारवाईविरोधात जैन समाज आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा

IND vs ENG 5th Test: शुभमन गिलच्या ७५४, तर हॅरी ब्रूकच्या ४८१ धावा, तरीही दोघांना Player Of The Series पुरस्कार कसा? गंभीरचा 'Role'

Latest Marathi News Updates Live : अंजली दमानिया विरोधात वॉरंट जारी

SCROLL FOR NEXT