मुंबई

कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू

CD

माणगाव, ता. ४ (बातमीदार)ः ताम्हिणी घाटातील दिघी-पुणे महामार्गावर मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत कारच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर निजामपूर परिसरातील एका हॉटेलजवळ दुसऱ्या अपघाताची नोंद आहे.
मौजे कोंडेथर गावच्या हददीत ताम्हिणी घाटामध्ये रस्त्यालगत एक टेम्पो फसला होता. हा टेम्पो हायड्राच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू असताना अल्लारखा गुलाब तांबोळीला (वय ३०) टेम्पोची पाहणी करत असताना चालक जगदीश जाधव, वय २७ वर्ष, रा. परोटी, जि. नांदेड याच्या ताब्यातील कारने पुणे बाजुकडून येताना जोरदार धडक दिली. यात अल्लारखा तांबोळीचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
ः----------------------------------
पोलिस ठाण्यात नोंद
मौजे निजामपूर येथे शिव हॉटेलजवळ कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे बाजूकडून माणगावकडे येणाऱ्या कारने रिक्षा स्टँडजवळ सलीम चाफेकरला धडक दिली होती. माणगाव उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाणे येथे करण्यात आली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT