मुंबई

दुचाकीस्वारांचा ''नंबर प्लेट'' हटवण्याचा नवा शक्कल

CD

दुचाकीस्वारांची ‘नंबर प्लेट’ हटवण्याची नवी शक्कल
वाहतूक विभागाच्या कारवाईपासून बचावासाठी नियोजित फसवणूक
जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई परिसरातील रस्त्यांवर एक नवा प्रकार समोर येत असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही कारवाईपासून बचाव होण्यासाठी अनेक दुचाकीस्वार नवे फंडे वापरत आहेत. विशेषतः वाहनाच्या मागील बाजूला नंबर प्लेट लावली जात नसल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. वाहनाचा मागील भाग हा सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येतो, त्यामुळे नियम मोडल्यास त्या आधारे दंड आकारला जातो, मात्र नंबर प्लेटच नसेल, तर गुन्हा नोंदवणे कठीण होते. हीच संधी साधून काही वाहनचालक कारवाई टाळत आहेत.
मोटर वाहन कायदा १९८८ नुसार, प्रत्येक वाहनावर स्पष्ट आणि अधिकृत नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे. तरीही नवी मुंबई परिसरात अनेक दुचाकीस्वार मागील प्लेट जाणूनबुजून लावत नसल्याचे समोर आले आहे. काहीजण तर नवीन गाड्यांचीही नंबर प्लेट तात्पुरती काढून ठेवत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे वाहन क्रमांक ओळखू न येणे, शोधकार्यात अडथळा येणे आणि गुन्हेगारीसाठी वाहनांचा वापर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने अलीकडेच नंबर प्लेट अनिवार्य केल्या आहेत. या प्लेट अ‍ॅल्युमिनियमपासून तयार झाल्यामुळे त्यांच्या चोरीच्या घटनादेखील वाढल्या आहेत. काही चालक या भीतीपोटी प्लेट लावत नसल्याचे म्हणत असले तरी वास्तवात मागील बाजूचा क्रमांक मुद्दामहून टाळण्यात येतो, असे वाहतूक विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
..............
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागाने कारवाईची गती वाढवली असून, अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर उपाययोजना केली जाणार आहे. विशेष मोहिमा राबवून शहरातील वाहन शिस्त पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील अशा प्रवृत्तींचा निषेध करावा आणि वाहतूक शिस्त पाळावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Mumbai Weather: उकाड्यामुळे मुंबईकर हैराण! आता पाऊस कधी दरवाजा ठोठावणार? हवामान विभागाने वेळच सांगितली

SCROLL FOR NEXT