सीएनजीच्या मार्गात ‘स्पीड ब्रेकर’
एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द; आठ महिन्यांत २१ तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : सीएनजीचा अपुरा पुरवठा, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अचानक कर्मचाऱ्यांकडून सीएनजी पुरवठा करण्यास अनेकदा दर्शविण्यात येणारी असमर्थतता आदी अडचणींचा सामना एसटी विभागाला करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक व उत्तम सुविधा देण्याच्या एसटी महामंडळाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात असल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखावा, यासाठी पर्यावरणपूरक अशा सीएनजीवर धावणाऱ्या बस एसटी विभागात दाखल होत आहे. अशातच सध्याच्या घडीला ठाणे एसटी विभागात २४६ सीएनजी बसेस असून, उर्वरित २७० बस या डिझेलवर चालविल्या जात आहेत. यामध्ये ठाणे १ मध्ये सीएनजीच्या ४३ च्या आसपास आणि ठाणे २ मध्ये ५५ च्या आसपास सीएनजीवर धावणाऱ्या बस आहेत. या बस ठाण्यासह भिवंडी, कल्याण, बोरिवली, मिरा रोड आदींसह इतर काही मार्गावर धावत आहेत, शिवाय काही बस या राज्यातील इतर काही भागातही जात असल्याची माहिती एसटी विभागातील सूत्रांनी दिली. या बसगाड्यांमध्ये सीएनजी भरण्यासाठी एसटीच्या ठाणे दोन, विठ्ठलवाडी आणि भिवंडी येथे सीएनजीची डेपो आहेत.
सीएनजीची फटका एसटीसह प्रवाशांनादेखील सहन करावा लागत आहे. १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत खोपट डेपो येथे असलेल्या सीएनजीच्या केंद्रावर सीएनजी भरण्यासाठी एकही कर्मचारी हजार न राहिल्याने या ठिकाणी बसच्या रांगा लागल्या होत्या. अखेर एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्ती केल्यानंतर सीएनजी भरण्यास सुरुवात झाली; मात्र या कालावधीत सकाळच्या सत्रात ३० ते ४० फेऱ्या रद्द झाल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
एसटीला फटका
नोझल मॅच होत नसल्याने सीएनजी भरता न येणे, सिएनजी पंपाचे कॉम्प्रेसरचे काम असल्याने ठाणे दोनच्या आगारच्या बसमध्ये सीएनजी भरला आला नाही, पंप मेटेंनेससाठी बंद, हाय व्होलटेजमुळे पंप बंद असणे, वीजपुरवठा खंडित झाल्याने सकाळी ११ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत पंप बंद, कमी व्होल्टेजमुळे पंप बंद ठेवणे, तांत्रिक कारणासाठी पंप बंद ठेवणे, सीएनजी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा फटकाही बसल्याचे दिसून आले. त्यातून प्रवाशांना त्रास आणि एसटीला नुकसानदेखील सोसावे लागल्याची बाब समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.