मुंबई

राखीव घरांसाठी आमदार, खासदारांचा अर्ज न आल्यास सामान्यांसाठी खुली होणार

CD

आमदार, खासदारांचा अर्ज
न आल्यास घरे खुली होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने कोकण मंडळाच्या सोडतीत ९० घरे आजी-माजी आमदारांसाठी राखीव ठेवली आहेत. या घरांसाठी अर्ज न आल्यास ती सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदरांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

म्हाडाच्या (भू विनियोग) नियमानुसार सोडतीत एकूण घरांपैकी काही घरे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेचे विद्यमान व माजी सदस्य या प्रवर्गासाठी दोन टक्के घरे राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रत्येक सोडतीत घरांच्या संख्येनुसार राखीव घरे ठेवली जातात. दरम्यान, या प्रवर्गासाठी आजी-माजी आमदार, खासदारांकडून अर्ज न मिळाल्यास त्यांच्यासाठी राखीव सदनिकांची बाब उच्चस्तरीय समितीच्या निदर्शनास आणून दिली जाते. तसेच प्रचलित कार्यपद्धतीनुसार ही घरे सर्वसाधारण जनता या प्रवर्गात समाविष्ट केली जातात, अशी माहिती म्हाडातर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता IPL 2026 स्पर्धेवरही? १९ वा हंगाम पुढे ढकलला जाणार? अध्यक्षांनी दिले अपडेट्स

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

SCROLL FOR NEXT