मुंबई

सुचकनाक्यावर अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी

CD

सूचक नाक्यावर अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी
अपघात वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय महामार्ग कल्याण-शिळ रोड सूचक नाका येथे अनेक शाळा असून, मोठी लोकवस्तीदेखील आहे. या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने या ठिकाणी येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत असून, या ठिकाणी अधिकारी दर्जाचा वाहतूक कर्मचारी व मदतनीस नेमण्याची मागणी मनोज वाघमारे यांनी केली आहे. सूचक नाका परिसरात सम्यक विद्यालय, सिद्धार्थ विद्या मंदिर, श्री. आर. के. विद्यालय, उर्दू शाळा अशा चार शाळा आहेत. या शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यास सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत येतात. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. यामध्ये शाळा सुटल्यास टाटाकडे जाणाऱ्या दिशेने विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी दुभाजकामधून विद्यार्थी व पालकांची रस्ता ओलांडण्यासाठी लगबग सुरू असते. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होत आहेत.
याबाबत वाहतूक विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी केली जात नाही. शुक्रवारी मनोज वाघमारे यांचा मुलगा मयूर वाघमारे (वय १३) याला मेट्रो ट्रेनच्या विकासासाठी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे व वाहतूक कर्मचारी नसल्यामुळे वाहनाची धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे येथे वाहतूक कर्मचारी व मदतनीस नेमण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थी, पालक, पादचारी यांचा गांभीर्याने विचार करून सूचक नाका या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी दर्जाचा कर्मचारी व मदतनीस यांना शाळेच्या वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्याची मागणी कोळसेवाडी उप वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे मनोज वाघमारे यांनी केली आहे.

MUM25F01154

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant: कोल्हापूरकर जिंकले! महादेवी परत येणार? वनताराच्या सीईओंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!

Sourav Ganguly: 'भारतीय क्रिकेट कोणासाठीही थांबत नाही', रोहित-विराटशिवाय खेळण्यावर गांगुलीचा स्पष्ट मेसेज; वाचा काय म्हणाला

'द ग्लोरी' ते 'पेंटहाऊस', हे ८ रिव्हेंज के ड्रामा तुम्हाला स्क्रिन समोरून हलूच देणार नाहीत; कुठे पाहाल?

Thane News: पलावा पुलाच्या कामावर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास शासनाची मंजुरी, मनसे नेत्याच्या पाठपुराव्याला यश

Electricity Supply: वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा..., महावितरणावर मनसे आक्रमक; वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT