
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी मठातील माधुरी हत्तीसाठी चर्चा करण्यासाठी वनताराची टीम दुसऱ्यांदा कोल्हापुरात आली होती. यानंतर नांदणी मठाच्या स्वामींसोबत वनताराच्या सीईओंची बैठक सुरू झाली. कोल्हापूरच्या जैन बोर्डिंगमध्ये ही बैठक घेण्यात आली आहे. बैठकीनंतर वनताराने आपलं अधिकृत म्हणणं जाहीर केलं आहे. यामध्ये वनताराच्या टीमने कोल्हापूरकर आणि नांदणी मठाची दिलगिरी व्यक्त केली आहे. यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे. महादेवी पुन्हा कोल्हापुरात परतणार की नाही याबाबत माहिती समोर आली आहे.