मुंबई

सात वर्षांपासून डॉक्टरची बनावटगिरी!

CD

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : रुग्णांवर खोटे उपचार करीत तब्बल सात वर्षे दुकानदारी करणाऱ्या एका बनावट डॉक्टरचा उल्हासनगरात पर्दाफाश झाला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कथित डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कोणताही वैद्यकीय परवाना नसताना श्रीकृष्ण कुमावत हा २०१८ पासून दवाखाना चालवत होता. उल्हासनगर कॅम्प चार येथील एसएसटी महाविद्यालयाजवळील ‘साई क्लिनिक’ या खासगी दवाखान्यात तो बिनधास्तपणे रुग्णांवर उपचार करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश डॉ. राकेश गाजरे यांनी केला. त्यांनी वेळोवेळी आरोग्य विभाग आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्याकडे या डॉक्टरविरोधात तक्रारी केल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला; मात्र कायद्याचा धाक न बाळगता त्याने दवाखाना बंद केला नाही. या बनावट डॉक्टरच्या बेकायदा कारभाराचे पुरावे गोळा करून डॉ. गाजरे यांनी पुन्हा एकदा पोलिसांपुढे पुरावे सादर केले. कुमावत रुग्णांवर उपचार, इंजेक्शन, औषधे लिहून देताना आणि तपासणी करतानाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने बनावट डॉक्टरवर अटकेची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : देश विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

Ganeshotsav: कृत्रिम तलावांची संख्या वाढणार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाची तयारी

SCROLL FOR NEXT