मुंबई

अमनजीत सिंह ठरले देशातील पहिले लाभार्थी

CD

अमनजीत सिंह ठरले देशातील पहिले लाभार्थी
कोरोनात आई-वडिलांचे झाले होते निधन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : कोरोना महामारीच्या काळात अनेक बालकांवरील आई-वडिलांचे छत्र हरपले होते. अशा अनाथ झालेल्या बालकांसाठी पंतप्रधान बाल संगोपन योजना राबविण्यात आली. या योजनेचे देशातील पहिले लाभार्थी अमनजीत सिंह ठरले असून, त्यांना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या हस्ते १० लाखांचा धनादेश देण्यात आला.
कोविड-१९ या साथीच्या रोगाने ज्या बालकांच्या आई-वडिलांचे निधन झाले, अशा बालकांसाठी पंतप्रधान बाल संगोपन या योजनेंतर्गत महिला व बालविकास विभाग, भारत सरकार यांच्याकडून अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे. कोविड-१९ या साथीच्या रोगाने अमनजीत सिंह यांच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. त्यांना महिला व बालविकास विकास विभाग, भारत सरकार यांच्यामार्फत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. ही रक्कम मुदत ठेव म्हणून पोस्ट खात्यात ठेवण्यात आली होती. सिंह यांची पोस्ट खात्यामध्ये ठेवलेल्या रकमेची मॅच्युरिटी सोमवारी (ता. ४) पूर्ण झाली. यानुसार हा १० लाखांचा धनादेश श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या हस्ते दिला आहे.
अमनजीत सिंह हे देशातील मुलांमधून पहिले लाभार्थी असून, राज्यातीलही पहिलेच लाभार्थी आहेत. ज्यांना वयाची २३ वर्षे पूर्ण होऊन अर्थसाह्याची रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात आली आहे. या वेळी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, भारतीय पोस्ट विभाग, वरिष्ठ अधीक्षक के. नरेंद्र बाबू, ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता विजय शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे, रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ठाणे संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) पल्लवी जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: ''जिवंतपणी लोकांचं श्राद्ध घालणाऱ्या गोट्या गित्तेला समाजसेवक म्हणून घोषित करा'', बाळा बांगर यांचा पोलिसांवर संताप

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा रस्ते कामांवर संशय; महाजनांच्या आदेशाने २५ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये

Vadigodri Crime : सीआयडी पोलीस असल्याचे सांगुन अंगठी लंपास; वडिगोद्री येथे दिवसा ढवळ्या घडला प्रकार

Latest Marathi News Live Update : नागपुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात

मनोरुग्ण महिला अर्धनग्न अवस्थेत फिरत होती, पोलिसांनी पाहिलं अन्...; हवालदाराच्या कृतीचं होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT