मुंबई

खालापूर पंचायत समिती आवारात मद्यपींचा धुडगूस

CD

खालापूर पंचायत समिती आवारात मद्यपींचा धुडगूस
स्मृतीस्थळांजवळ दारूचे अड्डे; नागरिकांमध्ये संताप
खालापूर, ता. ६ (बातमीदार) : खालापूर पंचायत समितीच्या आवारात काही मद्यपी तरुणांकडून धुडगूस सुरू आहे. विशेषतः, या तरुणांकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस्थळाजवळ दारूच्या बाटल्या फोडून जागेचे पावित्र्य भंग केल्याच्या प्रकारामुळे खालापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पंचायत समितीच्या आवारात रात्रीच्या वेळी काही युवकांकडून गोंधळ घातला जात आहे. त्‍यांच्याकडून मद्यपान केले जात असून परिसरात शिवीगाळ केली जात आहे. विशेष म्‍हणजे स्मृतीस्तंभाच्या भिंतीवर बसून हे गैरकृत्य सुरू असल्याने संपात व्‍यक्‍त केला जात आहे. अशा प्रकारांमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी रात्रीही अशाच एका टोळक्याने मद्यपान करून दारूच्या बाटल्या व बिअरचे टिन थेट ध्वजस्तंभ आणि स्मृतीस्तंभासमोर फेकून दिले. त्यामुळे परिसरात अस्वच्छतेसोबतच अपमानास्पद दृश्य दिसून आले. या घटनांमागील मुख्य कारण म्हणजे परिसरात सीसीटीव्ही यंत्रणांचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मद्यपी निर्धास्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कार्यालयाच्या बाहेरील भागात सीसीटीव्ही नसल्याने अशा घटना घडत आहेत. येत्या काळात येथे सुरक्षा रक्षक नेमणे व सीसीटीव्ही बसवण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल. शिवाय, मद्यपींवर पोलिस कारवाईसाठी पत्रव्यवहार केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT