मुंबई

सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा तरतरी

CD

उल्हासनगर, ता. ६ (बातमीदार) : आई-वडील आजारी असल्याने आणि त्यासाठी दवाखान्यातून वेळ मिळत नसल्याने स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करणारे उपअभियंता संदीप जाधव यांचे नागरिकांच्या मागणीनुसार पुनरागमन झाले आहे. त्यांच्या परत येण्याने उल्हासनगर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा तरतरी आली आहे. रखडलेल्या काँक्रीट रस्त्यांच्या कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकेकाळी २२ वर्षांपूर्वी तब्बल १४ अधिकारी कार्यरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हा विकासकामांत अग्रणी होता. कामांना गती मिळत होती. पुढे टप्याटप्याने १३ अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवर नीलेश शिरसाठे यांची कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती केली. काही तांत्रिक बाबीमुळे त्यांनी उशिराने पदभार स्वीकारला. अशातच सेवानिवृत्तीला नऊ वर्षे बाकी असताना आई-वडिलांच्या प्रकृती कारणास्तव उपअभियंता संदीप जाधव यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करून रजेवर गेले. त्यामुळे एकमेव कार्यकारी अभियंता शिरसाठे यांच्या खांद्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी येऊन ठेपली होती.
पावसाने उसंत घेतल्यावर एमएमआरडीएच्या सात रस्त्यांच्या कामांसोबत आणखीन कामांना गती द्यायचे नियोजन असल्याने जाधव यांनी कमबॅक करावे, अशी मागणी केली जात होती. अधिकारीही त्यासाठी प्रयत्न करत असल्याने शेवटी जाधव हे सार्वजनिक बांधकाम विभागात पुन्हा रुजू झाले आहेत. आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण, उपायुक्त विशाखा मोटघरे, कार्यकारी अभियंता नीलेश शिरसाठे यांच्या मार्गदर्शनाखाली पटलावर असणाऱ्या विकासकामांना गती देणार, असे उपअभियंता जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT