मुंबई

विकास कामेच जीवघेणी ठरण्याची शक्यता

CD

वसई, ता. ६ (बातमीदार) : एकीकडे अनेक भागात नागरिकांना मूलभूत समस्या जाणवत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कामांची सुरक्षादेखील वाऱ्यावर आहे. त्यामुळे प्रवास धोकादायक होण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.

वसई-विरार शहरात सद्य:स्थितीत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोंडी, अपघातांसह शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. दहीहंडी, गणेशोत्सव काळात खड्ड्यांचे विघ्न नागरिकांसमोर येऊ ठेपणार आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना, विविध पक्ष रस्ते दुरुस्तीची मागणी करू लागले आहेत. परिणामी काही भागात रस्ते दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे असले तरी दुरुस्त केलेल्या रस्त्याच्या अवतीभवती काठ्यांचा आधार घेतला जात आहे. सुरक्षेसाठी लोखंडी अडथळे किंवा फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे दुचाकी, टेम्पो, रिक्षा यासह अन्य वाहनांना अंधारात, तसेच दिवसादेखील प्रवास करताना समजून येत नाही.

वसई पश्चिम येथील साईनगर चौक व सनसिटी पोलिस चौकीसमोर, तसेच अन्य भागात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे. रात्रीच्या वेळेत हा मार्ग धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सुजाण नागरिक करू लागले आहेत.

रस्त्यावरच राडारोडा
रस्त्याच्या मधोमध असणारे चेंबर काही ठिकाणी खराब झाल्याने दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे, परंतु आजूबाजूला राडारोडा पसरला आहे, तसेच चेंबर बसविण्यात आले असले तरी खड्डा जैसे थे परिस्थितीत आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणाहून मुले, बस व अन्य लहान वाहनांना अडचणीचे ठरत आहे. एकीकडे वसई-विरार महापालिका विकास कामांसाठी निधी खर्च करीत असले तरी काम सुरू असताना व पूर्ण झाल्यावर त्याठिकाणची परिस्थिती काय आहे, याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT