मुंबई

अल्‍पवयीन विद्यार्थ्याला मारहाण

CD

अल्‍पवयीन विद्यार्थ्याला मारहाण
मालाड, ता. ६ (बातमीदार) ः खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्‍पवयीन विद्यार्थ्याला मारहाण केल्‍याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद अरहान (११) हा इयत्ता सहावीमध्ये शिकत असून, तो खासगी शिकवणी क्‍लासमध्ये जातो. तिथे सुजित आचार्य हा शिक्षक आहे. शनिवारी (ता. २) अरहान याला आणण्यासाठी त्‍याची आई क्‍लासमध्ये गेली असता, त्‍याने आपल्याला मारहाण केल्‍याचे सांगितले. तेव्हा आईला गाल, ओठ व इतर भागावर लालसर व्रण दिसून आले. घरी आल्‍यानंतर त्‍याची विचारपूस केली असता शिक्षकांनी काठीने मारहाण केली असल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍यानंतर अरहानला रुग्‍णालयात नेण्यात आले. सोमवारी (ता. ४) मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

आठवडाभरात दोन घटना
अवघ्या आठवडाभरात खासगी क्‍लासच्या शिक्षकांनी मुलांना मारहाण केल्‍याच्या दोन घटना उघडकीस आल्‍या आहेत. एक दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि आता दुसरी मालवणीत अशी घटना घडली आहे. मालवणीमधील हा शिक्षक मालाड मीठ चौकी येथील एका नामांकित शाळेत शिक्षक म्हणूनही काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT