मुंबई

श्रावणामुळे केळीच्या पानांना मागणी

CD

श्रावणामुळे केळीच्या पानांना मागणी
आदिवासी महिलांना रोजगाराची संधी
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः श्रावण महिन्यात धार्मिक व पारंपरिक विधींना महत्त्व असते. विशेषतः धार्मिक कार्यक्रम, उपास, व्रते यामध्ये केळीच्या पानावर भोजन करणे आरोग्यदायी समजले जाते. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये केळीच्या पानांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे.
रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील आदिवासी, डोंगराळ भागातील महिला व पुरुष केळीची पाने जंगलातून कापून शहरात विक्रीसाठी आणतात. रोज सकाळीच जंगलात जाऊन १५० ते २०० पाने कापली जातात. ती स्वच्छ करून गठ्ठ्यांमध्ये बांधून रेल्वेने उशिरा रात्री शहरी बाजारात आणली जातात. एक महिला दोन ते तीन गठ्ठ्यांचे ओझे डोक्यावर वाहून रेल्वे स्थानकात आणते. ही पाने रात्रीच रेल्वे स्थानकाजवळ साठवून सकाळी ग्राहकांना विकली जातात. श्रावणात एक अखंड केळीचे पान सुमारे १० रुपयांना विकले जात असून, या व्यवसायामुळे दोन महिने या कुटुंबांना रोजगार मिळतो. या कामात प्रचंड कष्ट असतात, जंगलातील सरपटणारे प्राणी, डासांचा त्रास, पावसामुळे चिखल, झाडीतून जाण्याचा धोका यांना तोंड द्यावे लागते. तरीही आदिवासी महिलांचा उत्साह लक्षणीय आहे. जयश्री करमोडा या आदिवासी महिलेने सांगितले की, हा आमचा हंगामी व्यवसाय आहे. श्रावणात या पानांना जास्त मागणी असल्याने दोन महिने तरी घरखर्च चालतो. या पारंपरिक व्यवसायामुळे आदिवासी महिलांना आर्थिक स्थैर्य मिळते.
............
रताळ्याची वाढली आवक
श्रावण महिन्यात उपवासाच्या खाद्यपदार्थांना विशेष मागणी असते. यामध्ये रताळा हा महत्त्वाचा कंदमूळ असल्याने, त्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रताळ्याची आवक सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणावर रताळा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत आहे. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये रताळ्याचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांच्या दरम्यान असून, किरकोळ बाजारात याच रताळ्याचे दर ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा संतुलित असल्याने दरामध्ये फारसा वाढ झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT