मुंबई

खड्ड्यांच्या विरोधात शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा

CD

खड्ड्यांच्या विरोधात शिवसेनेचा पालिकेवर धडक मोर्चा
गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आयुक्तांचे आश्वासन
खारघर, ता. ६ (बातमीदार) ः पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे याबाबत संतप्त झालेल्या शिवसेना (उबाठा गट) कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर धडक मोर्चा काढला. गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, अद्याप रस्त्यांची डागडुजी न झाल्यामुळे या मोर्चातून ठेकेदारांवर कारवाई आणि तातडीने खड्डे भरून रस्ते दुरुस्तीची जोरदार मागणी करण्यात आली.
या मोर्चात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन सादर केले. यावेळी आयुक्तांनी गणेशोत्सवपूर्वी सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी पूर्ण करून कामे वेळेत पूर्ण केली जातील, असे स्पष्ट आश्वासन दिले. मोर्चादरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी आयुक्तांच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांनी बॅरिकेड्स तोडत थेट पालिकेत प्रवेश करत संताप व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन महानगरप्रमुख अवचित राऊत यांनी केले होते. मोर्चामध्ये प्रदीप ठाकूर, दीपक घरत, गुरुनाथ पाटील, संदीप तांडेल, प्रकाश गायकवाड, पराग मोहिते, प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, प्रदीप केणी, गुरु म्हात्रे, प्रेमा अप्पाचा, रूपाली कवळे, अर्चना कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

SCROLL FOR NEXT