मुंबई

पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डोक्यातून काढली सळई

CD

पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डोक्यातून काढली सळई
भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : शहरात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मेट्रो पुलावरून एक लोखंडी सळई खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षाच्या आरपार जाऊन प्रवाशाच्या डोक्यात शिरल्याची घटना घडली. या गंभीर दुखापतीनंतरही यामधील जखमी सोनू अली हा शुद्धीत राहिला आहे. सोनू अली याच्यावर पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या डोक्यात शिरलेला सळईचा भाग बाहेर काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. श्रुती शेळके यांनी दिली आहे.

ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रो प्रकल्प पाचअंतर्गत पहिल्या टप्प्यातील काम जवळजवळ ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यातच मेट्रोच्या पुलावरून लोखंडी सळई खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षाच्या आरपार जाऊन प्रवाशाच्या डोक्यात शिरल्याची घटना मंगळवारी (ता. ५) दुपारी घडली. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने सोनूला अंजूरफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हलगर्जी करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोनू अली हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. एकटाच कमावता असल्यामुळे या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याप्रकरणी अपघातास जबाबदार मेट्रो कंत्राटदाराने सोनू अली याच्या सर्व उपचाराचा खर्च करून त्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT