मुंबई

आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन द्या!

CD

आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन द्या!
रमेश गायचोर यांची याचिका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः एल्गार परिषद प्रकरणातील कथित आरोपी रमेश गायचोर यांनी त्यांच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी याचिकेत केली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने (ता. ६) राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
गायचोर यांनी विशेष एनआयए न्यायालयाकडे केलेला अर्ज न्यायालयाने १ जुलैला फेटाळून लावला. त्या आदेशाला गायचोर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण बुधवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले. या वेळी एनआयएच्या वतीने बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला. तो मान्य करून न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. वडिलांचे वय ७५ वर्षे असून ते आजारी आहेत आणि पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मानवीय दृष्टिकोनातून अंतरिम जामीन देण्याची मागणी गायचोर यांनी केली होती. दरम्यान, एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी असलेल्या आणि जमावाला भडकाविल्याच्या आरोपाखाली कबीर कला मंचचे रमेश गायचोर यांना एनआयए ७ सप्टेंबर २०२०मध्ये अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Rajendra Bharud Action Kolhapur : कोल्हापूर महापालिकेचे 'ऑपरेशन बुलडोजर', १४३ बांधकामांवर कारवाई होणार; आयुक्त राजेंद्र भारुडांचे आदेश

SCROLL FOR NEXT