मुंबई

आयटीआय मधील विद्यार्थ्यांना आता मॅनेजमेंटचे धडे,

CD

‘आयटीआय’मध्ये मॅनेजमेंटचे धडे
अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांना लवकरच सुरुवात

मुंबई, ता. ६ : राज्यातील आयटीआयमधील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच ब‍िझनेस ॲनालिटिक, मार्केटिंग, प्रोडक्शन, फायनान्सियल अशा मॅनजमेंटच्या अभ्यासक्रमाचे धडे मिळणार आहेत. हे तीन ते चार महिन्यांच्या अल्प मुदतीतील अभ्यासक्रम असून, आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मोफत तर इतर विद्यार्थ्यांना शुल्क आकारून मॅनेजमेंट विषयाचे हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतील, अशी माहिती रोजगार व कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्य स्टार्टअप आणि नावीन्यता धोरण-२०२५ची घोषणा झाल्यानंतर त्यांनी या धोरणापलीकडे जाऊन पहिल्यांदाच विभागाने मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर स्किल, सर्व्हिस इंडस्ट्री आणि एआयवर आधारित अशा एकूण २० अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. हे अभ्यासक्रम राज्यातील प्रत्येक आयटीआमध्ये सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांना व्यवसाय इच्छुक विद्यार्थ्यांसोबतच आयटीआय, पदवीचे अभियांत्रिकी, कृषी असे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया आणि प्रत्यक्षात वर्गांना सुरुवात १९ सप्टेंबरदरम्यान होईल, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.
...
तीन ते चार महिन्यांचे अभ्यासक्रम
आयटीआयमध्ये पहिल्यांदाच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांमध्ये एआय, सोलार पॅनल इन्स्टॉलेशन मेंटनन्स, ईव्ही मशीन, इंडस्ट्रियल रोबोटिक्स अँड डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन आदी अभ्यासक्रम सुरू होत असून, हे तीन ते चार महिने कालावधीचे आणि सुमारे ४०० तासांपर्यंतचे आहेत. नवीन अभ्यासक्रमांमध्ये मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर स्किल, सर्व्हिस इंडस्ट्री आणि न्यूएज कोर्सेसमध्ये प्रत्येकी पाच असे २० अभ्यासक्रम असून, राज्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये जशी मागणी असेल त्याप्रमाणे पाच अभ्यासक्रम निवडून ते उपलब्ध केले जाणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

SCROLL FOR NEXT