मुंबई

‘गडकरी’ गाजवण्यासाठी कलाकार उत्सुक

CD

‘गडकरी’ गाजवण्यासाठी कलाकार उत्सुक
पालिका अधिकाऱ्यांसह कामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : रसिक प्रेक्षकांना अभिवादन करत राम गणेश गडकरी रंगायतन गाजवण्यासाठी कलाकारांसह निर्माते, दिग्दर्शक उत्सुक झाले आहेत. ठाणे शहराचे मानबिंदू असलेले गडकरी रंगायतनचे गेल्या काही महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते; हे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचा पडदा उघडण्याआधी नाट्यप्रेमी कलाकारांनी बुधवारी (ता. ६) गडकरी रंगायतनची पाहणी केली. नूतनीकरणाच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून काही सूचनाही केल्या.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली. त्या वेळी उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, व्यासपीठाच्या मागील बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांच्या कामांची पाहणी या वेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी उद्‍वाहनाची व्यवस्था करण्याचा निर्णय स्तुत्य आहेच. त्यासोबत, रंगायतनच्या तळमजल्यावर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करावी, अशी सूचना आजच्या पाहणीत करण्यात आली. तसेच, पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकीट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा यांचीही पाहणी करण्यात आली. दरम्यान, ‘गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार, निर्माते यांनी केलेल्या सूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर रंगायतन नाट्यरसिकांसाठी खुले करण्यात येणार आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.


गडकरी रंगायतनच्या कामाची आज पुन्हा पाहणी करण्यात आली. याठिकाणी काम चांगले झाले आहे. ध्वनी आणि प्रकाश योजनाही व्यवस्थित आहे. रंगपट आणि बॅक स्टेजला काही सुधारणा सुचवल्या आहेत. आता लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची संधी मिळू देत.
- प्रशांत दामले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

रंगमंचावरील प्रकाश योजनेबद्दल काही सूचना आजच्या पाहणीत केल्या आहेत. नूतनीकरणाचे उर्वरित काम चांगले झाले आहे. वास्तू आकर्षक झाली आहे. त्यात आता प्रयोगाचे रंग लवकर भरले जावेत.
- अशोक हांडे, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक

यापूर्वीच्या पाहणीच्या वेळी केलेल्या सूचनांची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्याचे पाहून चांगले वाटले. नूतनीकरणाचे काम योग्य पद्धतीने झाले आहे. ज्या काही एक-दोन गोष्टी होत्या; त्याही आजच्या पाहणीनंतर पूर्ण करण्याचा शब्द महापालिकेने दिला आहे.
- प्रसाद कांबळी, निर्माते

गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी थोडा वेळ लागला असला तरी ते काम चांगले झाले आहे. रंगमंचापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या जुळून आल्या आहेत.
- मंगेश देसाई, अभिनेते आणि निर्माते

ठाणे शहराची ओळख असलेली ही वास्तू चांगली होण्यासाठी उत्तम काम झाले आहे. सूचनांची अंमलबजावणी झालेली आहे. या वास्तूचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वजणांचे मनापासून कौतुक आहे.
- विजू माने, दिग्दर्शक आणि निर्माते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

SCROLL FOR NEXT