मुंबई

खंड्यांची चिमुकल्यांसोबत गट्टी

CD

माणगाव, ता. ९ (वार्ताहर)ः माणगावमधील वनवासी कल्याण आश्रमशाळेत रंगीबेरंगी सुंदर असा एक पक्षी आला होता. शाळेच्या आवारात हा पक्षी पाहण्यासाठी मुलांनी गर्दी झाली. शाळेचे अधीक्षक विलास देगावकर यांनी पक्ष्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडले; पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हा पक्षी शाळेत आल्याने विद्यार्थ्यांसोबतची मैत्री कुतूहलाचा विषय बनली आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे आदिवासी पाडे, गावांमधून आलेले विद्यार्थी शिकत आहेत. भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या भूप्रदेशात हे आदिवासी विद्यार्थी येत असल्याने जंगल परिसराची त्यांना चांगलीच ओळख असते. अशातच शाळेत अचानक आलेल्या पाहुण्याने या पक्ष्याबद्दल प्रचंड उत्सुकता मुलांमध्ये दिसून आली. या वेळी वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी एका खोक्यामध्ये ठेवलेल्या पक्ष्याला बाहेर काढत पाहणी केली. हा पक्षी तंदुरुस्त होता; पण अपरिपक्व पिल्लू असल्याने ते उडू शकत नव्हते.
------------------------------------------
पक्ष्यांचा वावर
पावसाळी दिवसात तिबोटी खंड्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. दक्षिणेकडून हे पक्षी मुख्यतः स्थलांतर करून कोकणात तसेच अगदी मुंबई ते गुजरातच्या सीमेपर्यंत नैसर्गिक आवासांमध्ये येतात. वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या आजूबाजूला जवळच मुबलक असा नैसर्गिक अधिवास उपलब्ध असल्याने या पक्ष्यांचा येथे वावर आहे.
---------------------------
मुलांचा आनंद गगनात मावेना
पिल्लू लहान, शिकाऊ असल्यामुळे चुकून भरकटून शाळेच्या आतील परिसरात येऊन शाळेतील व्हरांड्यात असलेल्या आरशाला धडकले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पक्ष्याला नैसर्गिक अधिवासात जाऊन मोकळे सोडताच खंड्याचे पिल्लू भरारी घेत स्वैरपणे उडून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT