मुंबई

मुंबईकरांना अनुभवता येणार डबेवाल्यांची सव्वाशे वर्षाची धगधगती कारकीर्द

CD

डबेवाल्यांचा इतिहास पुन्हा जागवणार!
वांद्र्यात उभारले भव्य अनुभव केंद्र; लवकरच खुले होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मॅनेजमेंट गुरू अशी जगभरात ख्याती असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचा सव्वाशे वर्षांचा इतिहास मुंबईकरांना पुन्हा अनुभवता येणार आहे. स्वच्छ पांढरा पोशाख, डोक्यावर टोपी, कपाळी टिळा आणि हातात डबा घेऊन धावपळ करणाऱ्या डबेवाल्यांची मेहनत, त्यांच्या कामाचे स्वरूप, वेळेचे नियोजन, याबाबत सर्वसामान्यांना माहिती मिळावी, म्हणून राज्य सरकारच्या मदतीने वांद्रे येथील कार्टर रोडवर मुंबई डबेवाला आंतराष्ट्रीय अनुभव केंद्र (एक्सपिरियन्स सेंटर) साकारण्यात आले आहे. लवकरच ते मुंबईकरांसह पर्यटकांसाठी खुले होणार आहे.
पुण्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील महादू हावजी बच्चे १८९० मध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आले. एका पारशी बँकरला पहिला डबा पोहोचवत त्यांनी या सेवेचा पाया रोवला. त्यानंतर हळूहळू मुंबईच्या विविध कार्यालयातील नोकरदारांना घरचे जेवण पोहोचवणारे डबेवाले ही मुंबईची ओळख निर्माण झाली. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत अगदी घड्याळाच्या काट्यावर धावपळ करणाऱ्या डबेवाल्यांनी मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळख निर्माण केली. सध्या मुंबईत जवळपास १४०० डबेवाले कार्यरत असून, त्यांच्याकडून सुमारे एक लाख डबे पोहोचवण्याचे काम ऊन, वारा, पावसातही अविरतपणे सुरू आहे. त्यांच्या कामाची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, म्हणून आमदार श्रीकांत भारतीय यांच्या प्रयत्नातून आणि राज्य सरकारच्या मदतीने सुमारे तीन हजार चौरस फूट जागेत कार्टर रोडवरील हार्मोनी इमारतीत भव्य अनुभव सेंटर उभारण्यात आले आहे.
----
काय अनुभवायला मिळणार?
- १८९० मध्ये सुरू झालेल्या या व्यवसायातील काळानुरूप बदलाचे चलचित्र, माहितीपटाद्वारे सादरीकरण
- डबेवाल्यांनी वापरलेले डबे, सायकल, हातगाडी
- ब्रिटनचे राजे प्रिन्स चार्ल्स यांनी डबेवाल्यांच्या घेतलेल्या भेटीच्या क्षणचित्रांचे स्वतंत्र दालन
- भारतीय पोस्टाने डबेवाल्यांवर प्रकाशित तिकिटांसह विविध संस्थांनी केलेल्या सन्मानांचे दालन
- डबेवाल्यांचे काम अनुभवण्यासाठी थ्रीडी गाॅगल्सची सुविधा
- १५-२० आसनक्षमतेचे लेक्चर रूम
----
नेमका डबा कसा ओळखतात?
दररोज हजारो घरी जाऊन दुपारी एकपूर्वी संबंधित व्यक्तीच्या कार्यालयात डबा पोहोचवला जातो. दीड हजार डबेवाल्यांकडून कधीच एकाही डब्याची अदलाबदल होत नाही. डब्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला वेगवेगळ्या दोऱ्यांचा वापर केला जात होता. कालांतराने दोऱ्यांऐवजी चिंधीचा वापर सुरू झाला. आता डब्यांचा रंग, नंबर आणि इंग्रजी मुळाक्षरावरून ओळखला जात असल्याचे डबेवाल्यांनी सांगितले.
----
प्रतिक्रिया
सव्वाशे वर्षांपासून आम्ही डबे पोहोचवण्याचे काम करीत आहोत. त्याची माहिती सामान्यांसह देशविदेशातील पर्यटकांना मिळावी म्हणून सरकारच्या मदतीने सुसज्ज अनुभव केंद्र उभारल्याचा आनंद आहे. त्यामुळे डबेवाल्यांची मेहनत, प्रामाणिकपणा लोकांना निश्चित कळेल.
- उल्हास मुके, अध्यक्ष, मुंबई डबेवाला संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT