मुरबाड (वार्ताहर) : तालुक्यातील सासणे न्हावे सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जनार्दन दवणे यांची निवड झाल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी संचालक सुभाष पवार यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी हभप रामभाऊ दळवी, बळीराम आगिवळे, रामचंद्र चौधरी, परेश कडव, वसंत घरत, राजाराम कडव, मालू कुर्ले, मनीष हिंदूराव, महादू सावळा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.