नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : उलवे सेक्टर-८ येथील ‘हॅपी फिंगर स्पा’ सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून चार पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेला अटक केली.
उलवे सेक्टर-८ मध्ये स्पा आणि मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी रहिवासी इमारतीतील मसाज सेंटरमध्ये बनावट ग्राहकाला पाठवले होते. या वेळी जयश्री पटेलने चार हजार घेतले होते. त्यानंतर छापा टाकून चार पीडितांची सुटका पोलिसांनी केली. याप्रकरणी उलवे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम १४३ (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम १९५६ कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सांगितले.