मुंबई

पालिकेत दुय्यम अभियंत्यांची रिक्त पदे तत्काळ भरा

CD

पालिकेत दुय्यम अभियंत्यांची रिक्त पदे तत्काळ भरा
न्यायालयात जाण्याचा युनियनचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, १४ ः मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी व विद्युत विभागातील पदाची अनुक्रमे ३०७ आणि १३२ पदे तत्काळ भरावीत अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा देणारे पत्र बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने महापालिका प्रशासनाला दिलेले आहे.
महापालिकेतील अभियांत्रिकी विभागातील अभियंत्यांच्या नियुक्ती, पदोन्नती, बदली, सेवाज्येष्ठता आदी कामकाज पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून केले जाते. महापालिकेतील अभियांत्रिकीच्या संवर्गात कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता या पदापर्यंतच्या पदोन्नतीची कार्यवाही केली जाते.
कनिष्ठ अभियंत्यांना दुय्यम अभियंतापदी पदोन्नती देताना एकूण पदांपैकी ५० टक्के कोटा आरक्षित आहे. त्यानुत्रसार, सध्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाची ३०७ पदे रिक्त असून, ती पदे खात्यांतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीने नियुक्त करणे आवश्यक आहे.
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदाची १३२ पदे रिक्त असून, ती पदे खात्यांतर्गत कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नतीने नियुक्त करणे आवश्यक आहे, मात्र नगर अभियंता कार्यालयाने एवढ्या मोठ्या प्रमाणात दुय्यम अभियंता पदे रिक्त ठेवून कनिष्ठ अभियंत्यांवर अन्याय होत असून, एकप्रकारे पदोन्नतीचा अधिकार नाकारला असल्याचे अभियंता युनियनने म्हटले आहे.

नगर अभियंता कार्यालयाचा दिसाळ कारभार
पदोन्नतीसाठी १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२६ हा कालावधी अहवाल वर्ष मानून त्या काळात सेवानिवृत्तीने पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घ्‍यावा, सेवाज्येष्ठतेनुसार निवड करून अभियंत्यांची आगाऊ पदोन्नती सूची तयार करावी; जेणेकरून रिक्त होणाऱ्या पदांवर क्रमवारीनुसार अभियंत्यांना पदोन्नती मिळू शकेल, अशा संघटनेने मागण्या केल्‍या आहेत. मागण्यांकडे नगर अभियंता कार्यालयाने सतत दुर्लक्ष केलेले आहे, असे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी पत्रात लिहीले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

Career Horoscope 30th Sept: उद्या गजकेसरी राजयोग! मान-सन्मान आणि यशाची दारे उघडणार; 'या' राशींचे करिअर झेपावणार

Godavari River Flood : गोदामाय कोपली! गेवराईतील ३२ गावातील दोन हजारांहून अधिक कुटूंबियाचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT