मुंबई

वाहतूक पोलिसांच्या कारवाईने चालकांना धडकी

CD

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले
सात महिन्यांत ७ कोटी ९२ लाखांचा दंड वसूल
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर)ः पर्यटन, औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील महामार्गांसह शहरातील अंतर्गत रस्ते, राज्यमार्गांवर वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रकार अनेकदा घडतात. अशा ८२ हजार २७२ चालकांकडून सात कोटी ९२ लाखांचा दंड गेल्या सात महिन्यात वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे अनेकांना भोवले आहे.
रागयड जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अशातच सध्या सणाचे दिवसांबरोबर पावसाळी पर्यटनाचा हंगामदेखील सुरू आहे. त्यामुळे विविध कारणांनी वाहतूक वाढल्याने रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवण्याने अनेकदा वाहनचालकासह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. शिवाय खड्डेमय रस्ते, साचलेल्या पाण्याने अपघातांचा धोका आणखी वाढतो. यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
------------------------------------
सूचना ः आकडेवारी येणे बाकी आहे.
कारवाईचा तपशील
वाहन प्रकार संख्या आकारलेला दंड
दुचाकी ३०,९६८ २ कोटी ५६ लाख
अवजड ट्रक १५,१४० १ कोटी ७९ लाख
ट्रक ९,८१२ १ कोटी ८० लाख
ट्रेलर ९,६११ १ कोटी ४१ लाख
खासगी कार ८,०८४ ६६ लाख
टेम्पो ३,७६४ ३३ लाख ४५०
एकूण - ८२ हजार २७२ ७ कोटी ९२ लाख
-------------------------
सीसीटीव्हीची मदत
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शहरातील वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. जे वाहनचालक अनेक दिवस दंड भरत नाहीत, त्यांच्याबाबतची सर्व माहिती व दंडाचे स्वरूप याबाबत न्यायालयाला कळविण्यात येते. यानंतर न्यायालयातर्फे नोटीस पाठवून पुढील कारवाई करण्यात येते.
-------------------------------
अतिवेगाने वाहने चालवून इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याची जाणीव वाहनचालकांना नसते. यासाठीच दंडात्मक कारवाईतून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जाते. राज्यमार्ग, शाळा, महाविद्यालयांच्या ठिकाणीही पोलिस तैनात आहेत.
-अभिजित भुजबळ, जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT